देसाईगंज : शहराच्या मुख्य बाजारपेठेतच सट्टापट्टीला उधाण आले आहे. दहा रुपयावर ऐंशी रुपये देण्याचे आमिष दाखवून सर्वसामान्य व्यक्तींची सर्रास लूट सुरू असून याकडे पोलीस विभागाचे दुर्लक्ष हाेत आहे.
तालुक्यातील नागरिक आठवडी बाजार तसेच विविध शासकीय कामासाठी देसाईगंज शहरात येतात. दहा रुपयावर ऐंशी रुपये देण्याचे आश्वासन सट्टापट्टी चालकाकडून दिले जाते. या आश्वासनाला सामान्य नागरिक, मजुरी करणारी जनता बळी पडत आहे. शहरातील बाजारपेठेतील एखाद्या दुकानात सट्टापट्टीचे एजंट बसून राहतात. सामान्य नागरिकांकडून सट्टापट्टीसाठी पैसे वसूल केले जातात. पाेलिसांचे याकडे दुर्लक्ष हाेत असल्याने सट्टापट्टी व्यवसायाला उधाण आले आहे. या व्यवसायातून लाखाे रुपयाची उलाढाल केली जात आहे. पाेलिसांनी सट्टापट्टी एजंटवर कारवाई करण्याची मागणी आहे.