गडचिराेली : रस्त्यावर विनाकारण वाद निर्माण करून चारचाकी तसेच दुचाकी वाहनधारकांना लुटण्याचे प्रकार अलीकडे राज्यात वाढले आहेत. असे प्रकार गडचिराेली जिल्ह्यातही घडण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यादृष्टीने नागरिकांनी सतर्क राहणे आवश्यक आहे. रस्त्यावर काेणी विनाकारण वाद घालत असेल तर त्यापासून दूरच राहणे याेग्य आहे.
रस्त्यावरून ये-जा करीत असताना एखाद्याला धक्का लागला किंवा गाड्यांची धडक झाली. यासारख्या कारणांवरून चाेरटे विनाकारण वाद घालतात. या वादाच्या माध्यमातून संबंधित व्यक्तीची वाट अडविली जाते. त्यानंतर एकटादुकटा पाहून त्याची आर्थिक लूट चाेरटे करतात. सध्या माेठ्या शहरांमध्ये अशाप्रकारच्या घटना घडत आहेत. राज्य तसे राष्ट्रीय महामार्गावर अधिक वर्दळ नसताना हे चाेरटे आपसातच वाद घालून किंवा एक किंवा एखाद्या व्यक्तीशी वाद घालून त्याला थांबवितात. त्यानंतर सापळ्यानुसार त्याला फसवून आर्थिक लूट करतात. विराेध केल्यास संबंधित व्यक्तीचा जीव घेण्यासही मागे-पुढे पाहत नाहीत.
बाॅक्स...
काेरची तालुक्यात घडले वाटमारीचे प्रकार
काेरची तालुक्यातून छत्तीसगड राज्यात राष्ट्रीय महामार्ग जाताे. या महामार्गावर अनेकदा रात्रीच्या सुमारास ट्रकचालकांना विविध कारणांनी अडवून त्यांच्याकडील पैसे तसेच अन्य वस्तू लंपास केल्याच्या घटना गेल्यावर्षी घडल्या. गडचिराेली शहरात अशाप्रकारच्या वाटमारीच्या घटना घडल्या नाहीत. परंतु बँकेतून बाहेर पडत असताना अज्ञात चाेरट्यांनी पिशवी तसेच बॅग लंपास केल्याच्या घटना तीन ते चार वर्षांपूर्वी घडल्या आहेत.
..............
काय काळजी घ्यावी?
प्रवासात असताना आर्थिक लुटमारीच्या अनेक घटना घडतात. त्यामुळे प्रवासात सर्वाधिक सतर्क राहणे आवश्यक आहे. अनेकदा चाेेरटे लूट करण्यापूर्वी संबंधित व्यक्तीसाेबत सलगीने वागून त्याच्याशी मैत्री करतात. त्यानंतर आपुलकी दाखवून आर्थिक लूट करतात. त्यामुळे प्रवास करीत असताना अनाेळखी व्यक्तीवर विश्वास ठेवू नये. लघुशंका किंवा अन्य कारणांसाठी बाहेर पडत असताना आपल्याकडील वस्तू दुसऱ्याकडे देऊ नये. पैसे व्यवस्थित ठेवून वेळाेवेळी खात्री करावी.
बाॅक्स...
असे तुमच्याही बाबतीत घडू शकते
- बँकेतून एखादी व्यक्ती पैसे काढून घराकडे जात असेल तर चाेरटे सदर व्यक्तीवर पाळत ठेवून त्याच्या मागे जातात. त्यानंतर साेबत जात असतानाच तुमचे पैसे खाली पडले, असे भासवून सदर व्यक्तीकडील बॅग अथवा पैशाची पिशवी घेऊन पळून जातात. त्यामुळे बँकेतून पैसे नेत असताना खबरदारी व काळजी घ्यावी.
- प्रवास करताना एखाद्या व्यक्तीकडे पैसे असल्याची खात्री चाेरट्यांना झाल्यास त्याला मदत करण्याच्या हेतूने चाेरटे सदर व्यक्तीचे सामान पकडण्याचा विनाकारण आग्रह करतात किंवा बसमध्ये चढताना तुमच्या वस्तू मी पकडताे, असे सांगून आपुलकी निर्माण करतात व त्यानंतर खिशात असलेले पैसे लंपास करतात.
- बसथांब्यावर किंवा सार्वजनिक ठिकाणी उभे असताना चाेरट्यांना संबंधित व्यक्तीकडे पैसे असल्याची खात्री झाल्यानंतर चाेरटे माझ्या माेबाईलमध्ये बॅलेन्स नाही, कृपया काॅल करण्यासाठी माेबाईल द्यावे, अशी विनंती करून माेबाईल मागतात व संबंधित व्यक्तीला व्यस्त ठेवून दुसऱ्या साथीदारामार्फत त्याची आर्थिक लूट करतात.