गाेपाल लाजूरकरगडचिराेली : जिल्ह्याच्या घनदाट जंगलात वाघ, बिबट व अस्वलांसारख्या हिंस्त्र प्राण्यांपासून धाेका असतानाच रानटी हत्तींचाही धुमाकूळ गत दाेन वर्षांपासून वाढला. त्यामुळे वनाेपजावर अवलंबून असलेल्या लाेकांच्या जीवनामानास कुठेतरी बाधा निर्माण झाली. छत्तीसगड-काेरची-मालेवाडा ह्या सीमावर्ती भागात राहून वारंवार लाेकांना भयभित करणारे रानटी हत्ती तेंदूपाने संकलनाच्या हंगामात पुन्हा धाेकादायक ठरत आहे. नुकतेच हत्तींनी पिटेसूर भागात तेंदूमजुरांना भयभीत केले हाेते.
गडचिराेली-छत्तीसगड राज्याच्या सीमावर्ती भागात रानटी हत्तींचा वावर गेल्या दाेन वर्षांपासून आहे. २३ च्या संख्येने असलेला हा कळप अधून-मधून महाराष्ट्र व छत्तीसगड राज्याच्या विविध तालुक्यांमध्ये येत असताे. एप्रिल महिन्यात हत्तींच्या कळपाचे दाेन भाग झाले हाेते. हत्तींचा अर्धा कळप कांकेर जिल्ह्यात तर दुसरा अर्धा कळप गाेंदिया जिल्ह्यात गेला हाेता. सध्या एक कळप काेरची तालुक्यातील बेळगाव व गाेंदिया जिल्ह्यातील चिचगड आदी भागात रानटी हत्तीच्या कळपाचे सध्या आवागमन सुरू आहे.पिटेसूरच्या जंगलात तेंदूमजुरांना हत्तींचे दर्शनगाेंदिया जिल्ह्यात काही दिवस राहिलेला रानटी हत्तींचा कळप मागील आठवड्यात पुन्हा गाेंदियाच्या चिचगड भागातून कुरखेडा तालुक्यातील चारभट्टी परिसरात दाखल झाला हाेता. गुरूवार २५ मे राेजी पिटेसूर परिसरातील माऊली जंगलात तेंदूपाने ताेडण्यासाठी गेलेल्या लाेकांना कळप दिसून आला. हत्ती दिसताच मजूर गावाकडे परत आले, असे चारभट्टी येथील मजुरांनी सांगितले. त्यामुळे या भागातील तेंदूपाने गाेळा करणाऱ्या लाेकांमध्ये भीतीचे वातावरण आहे.शेतातील झाेपड्या व उन्हाळी धान लक्ष्यकुरखेडा वन परिक्षेत्रातील कक्ष क्रमांक १५९ मधील वडेगाव-आंजनटाेला जंगलात आठवडाभरापूर्वी रानटी हत्तींचा वावर हाेता. त्यानंतर हत्तींनी काेरची तालुक्याच्या दिशेने माेर्चा वळविला. सध्या तेंदूपाने संकलनाचे काम सुरू असताना मजूर जंगलात पाने ताेडण्यासाठी जात आहेत; परंतु ते सुरक्षित नाहीत. काेरची व कुरखेडा तालुक्यात सध्या उन्हाळी धानपीक आहे. जंगलालगतचे धान पीक रानटी हत्ती नासधूस करू शकतात. विशेष म्हणजे, शेतातील झाेपड्यांची नासधूस ते करीत आहेत.पुराडाचे वनाधिकारी अनभिज्ञकुरखेडा तालुक्यातही तेंदूपाने हंगाम जाेमात सुरू आहे. या भागातील वडेगाव-आंजनटाेला येथे मागील आठवड्यात रानटी हत्तींचा वावर हाेता. तर गुरूवार २५ मे राेजी चारभट्टीच्या जंगलात मजुरांना रानटी हत्तींपासून धाेका हाेण्याची शक्यता हाेती; परंतु मजुरांनी आरडाओरड केली व ते घराकडे परत आले. एवढा प्रकार घडला असतानाही सध्या रानटी हत्ती कुठे आहेत, याबाबत पुराडाच्या वनपरिक्षेत्राधिकाऱ्यांना काहीच माहीत नसल्याचे त्यांनी सांगितले.