भामरागड : गणेशोत्सवानिमित्त पोलीस स्थानक, भामरागड व सी. आर. पी. एफ. बटालियन ३७ यांच्या संयुक्त विद्यमाने दि. १५ सप्टेंबर रोजी रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. जास्तीत जास्त दात्यांनी रक्तदान करावे, असे आवाहन भामरागडचे ठाणेदार किरण रासकर यांनी केले होते. या आवाहनाला उत्स्फूर्त प्रतिसाद देत ६४ दात्यांनी रक्तदान केले.
या शिबिराचे उद्घाटन सी. आर. पी. एफ. ३७ बटालियनचे कमांडंट मोहनदास खोब्रागडे यांच्या हस्ते करण्यात आले. या शिबिराकरिता द्वितीय कमान मदनमोहन क्रिश्नन, सहाय्यक कमांडन्ट नितीश रामपाल, डॉ. भावेश वानखेडे, तबरेज अल्ली सय्यद, उपअभियंता सचिन काळे, निखीलकुमार कोंडापर्ती तसेच औद्योगिक प्रशिक्षण संस्था, भामरागड येथील शिक्षक व विद्यार्थी तसेच पोलीस स्थानक भामरागड हद्दीतील युवक व गावातील प्रतिष्ठित नागरिक उपस्थित होते. या शिबिरात स्वच्छेने एकूण ६४ दात्यांनी रक्तदान केले. शिबिरासाठी पाेलीस कर्मचाऱ्यांनी सहकार्य केले.
150921\590420210915_110920.jpg
रक
रक्तदान शिबिरात रक्तदान करताना किरण रासकर