लोकमत न्यूज नेटवर्कगडचिरोली/भामरागड : पर्लकोटा नदीच्या पुलावरून सलग तिसºया दिवशीही पाणी वाहात असल्याने भामरागडसह तालुक्यातील १०० पेक्षा अधिक गावांचा जिल्हा मुख्यालयाशी संपर्क तुटलाच होता.रविवारी गडचिरोली जिल्ह्यासह छत्तीसगड राज्यात दमदार पाऊस झाला. त्यामुळे भामरागड तालुक्यातील प्रमुख नद्या असलेल्या पर्लकोटा, पामुलगौतम व इंद्रावती नदीच्या पाण्याची पातळी वाढली होती. शनिवारी रात्री अचानक पर्लकोटाची पाणीपातळी वाढली. त्यामुळे पुलावरून पाणी वाहायला सुरुवात झाली. मात्र रविवारी पहाटे पुलावरील पाणी ओसरले. त्यानंतर रविवारी दुपारी पुन्हा पुलावरून पाणी चढले. सोमवारी पावसाने उसंत घेतली तरीही पर्लकोटा नदीच्या पाण्याची पातळी अतिशय संथ गतीने कमी होत होती. रविवारी भामरागड शहरात शिरलेले पाणी ओसरले. मात्र सोमवारी दिवसभर पर्लकोटाच्या पुलावरून पाणी वाहत होते. त्यामुळे भामरागडसह तालुक्यातील १०० पेक्षा अधिक गावांचा जिल्हा मुख्यालयाशी संपर्क तुटला होता. सोमवारी दिवसभर भामरागड येथील वीज पुरवठा खंडित होता.भामरागड वगळता इतर ठिकाणच्या नाल्यांवरील पाणी ओसरल्याने त्या ठिकाणची परिस्थिती पूर्वपदावर आली होती. जिमलगट्टाजवळील देचलीपेठा नाल्यामुळे या परिसरातील १० गावांचा संपर्क तुटला होता. मात्र सोमवारी नाल्याचे पाणी कमी झाले. भामरागड-आलापल्ली मार्गावरील पेरमिली नाल्याच्या पुलावरचेही पाणी ओसरले. सिरोंचा तालुक्यातील बामणी व टेकडाताला या ठिकाणच्या नाल्यांवरीलही पाणी ओसरल्याने मार्ग सुरू झाले व जीवन पूर्वपदावर आले.कार्यालयांमध्ये शुकशुकाटभामरागड तालुक्यातील बहुतांश कर्मचारी अहेरी, आलापल्ली येथून ये-जा करतात. शनिवार व रविवारची सुटी असल्याने कर्मचारी गावाकडे गेले होते. सोमवारी दिवसभर पर्लकोटा पुलावरून पाणी असल्याने कर्मचारी भामरागडात पोहोचू शकले नाही. त्यामुळे बहुतांश शासकीय कार्यालयांमध्ये शुकशुकाट पसरला होता. शिक्षकही आले नसल्याने अनेक शाळा बंदच होत्या. भामरागड येथूनही बाहेर जाणे शक्य नव्हते. त्यामुळे भामरागडात आलेले प्रवाशी व इतर नागरिक भामरागड येथेच अडकले होते.
तिसऱ्या दिवशीही भामरागड संपर्काबाहेर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 13, 2018 10:52 PM
पर्लकोटा नदीच्या पुलावरून सलग तिसºया दिवशीही पाणी वाहात असल्याने भामरागडसह तालुक्यातील १०० पेक्षा अधिक गावांचा जिल्हा मुख्यालयाशी संपर्क तुटलाच होता.
ठळक मुद्देपर्लकोटाच्या पुलावर पाणी कायम : तालुक्यातील जनजीवन विस्कळीत; भामरागडातील पूर ओसरला