लोकमत न्यूज नेटवर्कभामरागड : छत्तीसगड राज्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे पर्लकोटा नदीवरील पुलावर मंगळवारी रात्री ९ वाजता पाणी चढले. त्यामुळे भामरागडवासीयांचा जीव पुन्हा टांगणीला लागला असल्याचे दिसून येत होते. पर्लकोटा नदीच्या अगदी तिरावर असलेल्या भामरागड शहरात यावर्षीच्या पावसाळ्यात जवळपास सहा वेळा पाणी शिरले आहे. सतत घरात व दुकानांमध्ये पाणी शिरत असल्याने साहित्याचे नुकसान होत आहे. पाऊस आता ओसरेल, अशी शक्यता असतानाच मंगळवारी सकाळपासून पर्लकोटा नदीच्या पाण्याची पातळी वाढली. दिवसभरात पुलाला पाणी टेकले होते. रात्री पुलावरून पाणी चढले. पूर परिस्थिती निर्माण होण्याची शक्यता असल्याने मंगळवारची संपूर्ण रात्र प्रशासन व भामरागडवासीयांना जागून काढावी लागली.पालकमंत्र्यांचा कार्यक्रम रद्दभामरागड येथील आदिवासी मुलामुलींच्या वसतिगृहाचे लोकार्पण मंगळवारी पालकमंत्री अम्ब्रीशराव आत्राम यांच्या उपस्थितीत आयोजित केले होते. मात्र पूर परिस्थिती निर्माण झाल्याने कार्यक्रम रद्द झाला. ग्रामीण भागातून आलेल्या नागरिकांना निराश होऊ परतावे लागले.
भामरागडवासीयांचा जीव टांगणीला
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 29, 2018 1:10 AM
छत्तीसगड राज्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे पर्लकोटा नदीवरील पुलावर मंगळवारी रात्री ९ वाजता पाणी चढले. त्यामुळे भामरागडवासीयांचा जीव पुन्हा टांगणीला लागला असल्याचे दिसून येत होते. पर्लकोटा नदीच्या अगदी तिरावर असलेल्या भामरागड शहरात यावर्षीच्या पावसाळ्यात जवळपास सहा वेळा पाणी शिरले आहे.
ठळक मुद्देपुन्हा पूर परिस्थिती : मंगळवारी रात्री ८ वाजता पुलावर चढले पाणी