गैरव्यवहार दूर होणार : स्वस्त धान्य दुकानदारांना प्रशिक्षण भामरागड : तालुक्यातील स्वस्त धान्य दुकानदारांना पीओएस मशीनचे वितरण करण्यात आले आहे. या मशीनच्या माध्यमातून धान्य वितरणाची नोंद आॅनलाईन पद्धतीने घेतली जाणार आहे. पीओएस मशीनचे वितरण केल्यानंतर दुकानदारांना मशीन कशी हाताळावी, याबाबतचे प्रशिक्षण देण्यात आले. कंपनीचे प्रतिनिधी मनोजकुमार सिंघल, स्वप्नील डांबरे यांनी मशीन हाताळण्याबाबत मार्गदर्शन केले. यावेळी नायब तहसीलदार कोकोडे, पुरवठा निरीक्षक ए. टी. भंडरवाड आदी उपस्थित होते. पीओएस मशीनला आयडीया कंपनीचे सीम लावण्यात आले आहे. मात्र भामरागड तालुक्यात बीएसएनएलचे टॉवर आहेत. त्यामुळे मशीने सीम बदलवून बीएसएनएलचे लावण्यात यावे, अशी मागणी स्वस्त धान्य दुकानदारांकडून करण्यात आली. याबाबतची सूचना वरिष्ठस्तरावर दिली जाईल, असे आश्वासन उपस्थित असलेल्या कर्मचाऱ्यांनी दिले. पीओएस मशीनमुळे धान्य वितरणातील गैरव्यवहार दूर होण्यास मदत होणार आहे. (तालुका प्रतिनिधी)
भामरागडात पीओएस मशीन उपलब्ध
By admin | Published: March 22, 2017 2:21 AM