लोकमत न्यूज नेटवर्करांगी : एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प गडचिरोली अंतर्गत येणाऱ्या आश्रमशाळांचे क्रीडा संमेलन रांगी येथील शासकीय माध्यमिक व उच्च माध्यमिक आश्रमशाळेत २५ ते २७ सप्टेंबर दरम्यान आयोजित करण्याज आले होते. यात भाडभिडी बिटने विजेते पद तर कारवाफा बिटने उपविजेते पद पटकाविले.विजेता व उपविजेता संघाला सहायक जिल्हाधिकारी तथा प्रकल्प अधिकारी डॉ. सचिन ओम्बासे यांच्या हस्ते चषक देऊन गौरविण्यात आले. पारितोषीक वितरण कार्यक्रमाला प्रमुख अतिथी म्हणून आयटी अभियंता राहूल वाघ, रांगी आश्रमशाळेचे मुख्याध्यापक सुरेश पिलारे आदी उपस्थित होते. यावेळी मार्गदर्शन करताना डॉ. सचिन ओम्बासे म्हणाले, आश्रमशाळेत नवनियुक्त क्रीडा मार्गदर्शकांनी पुढील खेळांसाठी खेळाडूंची चांगली तयारी करून घ्यावी. विभागीय व राज्यस्तरीय क्रीडा संमेलनात जास्तीत जास्त खेळाडूंनी भाग घेऊन कौशल्य दाखवावे, असे मार्गदर्शन केले. भाडभिडी बिटने ३५० गुण प्राप्त करून प्रथम क्रमांक पटकाविला. भाडभिडी बिटात भाडभिडी, रेगडी, मार्र्कंडादेव येथील शासकीय आश्रमशाळा तर चामोर्शी, अड्याळ, पावीमुरांडा, कन्हाळगाव, गुंडापल्ली या अनुदानित आश्रमशाळांचा समावेश आहे. उपविजेता कारवाफा संघाने ३१५ गुण प्राप्त केले. कारवाफा बिटात कारवाफा, पोटेगाव, पेंढरी, गोडलवाही, गडचिरोली येथील शासकीय आश्रमशाळा तर चांदाळा, गिरोला, गट्टा या अनुदानित आश्रमशाळांचा समावेश आहे.क्रीडा संमेलनात कारवाफा, भाडभिडी, सोडे, अंगारा, कोरची या पाच बिटातील २५ शासकीय, १८ अनुदानित अशा एकूण ४३ आश्रमशाळांच्या १ हजार ४६ खेळाडूंनी सहभाग घेतला. सांघिकसह वैयक्तिक खेळांचे आयोजन १४, १७, १९ वयोगटात करण्यात आले.संचालन क्रीडा समन्वयक संदीप दोनाडकर, अनिल सोमनकर यांनी केले. यशस्वीतेसाठी प्रसिध्दी प्रमुख सुधीर शेंडे, धनंजय वाणी, किशोर येळणे, प्रेमिला दाहागावकर, व्ही. जी. चाचरकर, प्रमोद वरगंटीवार, सतीश पवार, सुधीर झंझाळ, सुभाष लांडे, अनिल सहारे,भावना इरखेडे, मनोज आचार्य,तुकाराम सोनकुसरे, गणेश अलोने, विनोद चलाख, एम. जी. मैंद, विनायक क्षीरसागर, चंदा कोरचा, मंगेश ब्राम्हणकर, वर्षा सांगोळे, पुष्पा बागळे, रामचंद्र टेकाम, लुमेशा सोनेवाने, पुरूषोत्तम भोयर, संदीप बिसेन, अनिल रामटेके, योगीता बिसेन, रामचंद्र दशमुखे तसेच प्रकल्पातील कर्मचारी व विद्यार्थ्यांनी सहकार्य केले
क्रीडा स्पर्धेत भाडभिडी बिट ठरला अव्वल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 28, 2018 12:03 AM
एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प गडचिरोली अंतर्गत येणाऱ्या आश्रमशाळांचे क्रीडा संमेलन रांगी येथील शासकीय माध्यमिक व उच्च माध्यमिक आश्रमशाळेत २५ ते २७ सप्टेंबर दरम्यान आयोजित करण्याज आले होते.
ठळक मुद्देकारवाफा संघ उपविजेता : गडचिरोली प्रकल्पातील ४३ आश्रमशाळांच्या खेळाडूंचा सहभाग