भेंडाळा परिसर कोरोनामुक्त करण्याच्या उद्देशाने भेंडाळा प्राथमिक आरोग्य केंद्राच्या सर्व कर्मचाऱ्यांनी अहोरात्र मेहनत घेऊन गावागावात फिरून काेराेना प्रतिबंधक लस नागरिकांना टोचून घेण्याबाबत माहिती देत योग्य मार्गदर्शन केले. सर्व चमूने कोरोना काळात उत्कृष्ट सेवा देऊन नियोजनबद्ध लसीकरण करून जिल्ह्यात सर्वाधिक लसीकरण व कोरोना टेस्ट करून भेंडाळा आरोग्य केंद्राचा जिल्हा पातळीवर नावलौकिक केला त्याबद्दल येथील वैद्यकीय अधिकारी डॉ. विजय साबणे व त्यांच्या सहकारी कर्मचाऱ्यांचे स्वागत व सत्कार करण्यात आला. यावेळी सरपंच कुंदा जुवारे, उपसरपंच विठ्ठल सातपुते, सदस्य संजय चलाख, निखिल उंदीरवाडे, गुरुदेव डांगे, ज्योती नंदेश्वर, गीता तुंबडे, वर्षा सातपुते, कुसुम उंदीरवाडे, सचिव सुनीता कुमरे ताई व ग्रा. पं. कर्मचारी उपस्थित होते.
===Photopath===
080621\59000717img-20210605-wa0213.jpg
===Caption===
ग्रामपंचायत भेंडाळा च्या वतीने डॉ.विजय साबने यांचा सत्कार करतांना सरपंच , सदस्य गण