लोकमत न्यूज नेटवर्कदेसाईगंज : माकडाची शिकार करण्याच्या झटापटीत जीवंत वीज तारेच्या स्पर्शाने बिबट व माकडाचा मृत्यू झाल्याची घटना रविवारी देसाईगंज तालुक्यातील एकलपूर जवळील शेतात घडली.एकलपूर येथील एका शेतात आंब्याच्या झाडाला लागूनच वीज तारा गेल्या आहेत. माकड झाडावर असताना त्याची शिकार करण्यासाठी बिबट्याही झाडावर चढला. जीव वाचविण्याच्या प्रयत्नात माकडाने वीज तारा लागून असलेल्या फांदीवर उडी घेतली. यामुळे माकडाला विजेचा धक्का लागला. त्यामुळे माकड जागीच थांबले. त्यानंतर बिबट्यानेही शिकारीसाठी माकडावर हल्ला केला. यात बिबट्यालाही विजेचा धक्का बसला. माकड व बिबट दोघेही ठार होऊन झाडाखाली कोसळले. याबाबतची माहिती मिळताच वन विभागाचे पथक घटनास्थळी दाखल झाले. देसाईगंज वन विभागाचे उपवनसंरक्षक निरंजन विवरेकर, सहायक वनसंरक्षक कांबळे यांनी घटनास्थळाचा पंचनामा केला.वीज खांबाला स्पर्श झाल्याने बैल ठारआरमोरी : चामोर्शी माल येथील निलकंठ गुरूफुले यांच्या मालकीच्या बैलाचा विद्युत प्रवाह सुरू असलेल्या वीज खांबाला स्पर्श झाल्याने बैल जागीच ठार झाल्याची घटना २९ जुलै रोजी सकाळी ९ वाजताच्या सुमारास घडली. गुरूफुले हे शेतावर बैल नेत असताना सदर अपघात घडला.वीज तारा, वीज खांब यांना स्पर्श झाल्याने जनावरांचा मृत्यू झाल्याच्या १० पेक्षा अधिक घटना यावर्षी गडचिरोली जिल्ह्यात घडल्या आहेत. यावरून वीज विभागाची यंत्रणा व्यवस्थित काम करीत नसल्याचे दिसून येत आहे. याकडे वरिष्ठ अधिकाऱ्यांनी लक्ष घालावे, अशी मागणी होत आहे. चौकशी करून दोषी कर्मचाऱ्यांवर कारवाई गरजेची आहे.
शिकारीच्या प्रयत्नात बिबट व माकड ठार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 29, 2019 10:23 PM
माकडाची शिकार करण्याच्या झटापटीत जीवंत वीज तारेच्या स्पर्शाने बिबट व माकडाचा मृत्यू झाल्याची घटना रविवारी देसाईगंज तालुक्यातील एकलपूर जवळील शेतात घडली.
ठळक मुद्देएकलपूर येथील घटना : शेतातील झाडाजवळून गेलेल्या जिवंत वीज तारांना स्पर्श