शहरं
Join us  
Trending Stories
1
'शिवसेनेमुळे काँग्रेस-राष्ट्रवादीला सत्ता मिळाली', ठाकरेंचा नेता मुख्यमंत्रि‍पदाबद्दल काय बोलला?
2
धक्कादायक माहिती! 'त्या' दुर्घटनाग्रस्त हेलिकॉप्टरने सुनील तटकरे करणार होते प्रवास
3
अनंत अंबानी उद्धव ठाकरेंच्या भेटीला; 'मातोश्री'वर २ तास बैठक, काय घडलं?
4
'...ही चूक पुन्हा झाल्यास कठोर कारवाई होणार'; Suzlon Energy ला BSE, NSE चा इशारा
5
स्वत:च शिवली वर्दी, पैशांबाबत बोलला खोटं; २ लाखांत IPS झालेल्या मिथिलेशच्या कहाणीत नवा ट्विस्ट
6
गोविंदाला गोळी लागल्यानंतर रात्री उशिरा कृष्णा अभिषेकची सोशल मीडिया पोस्ट; म्हणाला, 'मामा...'
7
Video - संतापजनक! फी न भरल्याची तालिबानी शिक्षा; शाळेतून काढून टाकलं, उन्हात बसवलं अन्...
8
"PM मोदींचा फोन आला, पण 'त्या' अटींमुळे बोलले नाही"; विनेश फोगटचा खुलासा
9
नवरात्रोत्सव का साजरा करतात? नवरात्रात नेमके काय करावे? वाचा, प्राचीन लोकोत्सवाचे महात्म्य
10
युद्ध पेटलं! इराणचा इस्त्रालयवर मिसाईल हल्ला; अमेरिकन सैन्यानं दिलं चोख उत्तर
11
कथोरे, आव्हाड, केळकर यांची प्रश्नांची सरबत्ती; चौदाव्या विधानसभेत आघाडीवर; नाईक, जैन तळाशी
12
नवरात्र: भक्तांसाठी स्वामींनी घेतले गृहलक्ष्मीचे रुप; अन्नपूर्णा होऊन दर्शन दिले, खाऊही घातले
13
Navratri 2024: मंचकी निद्रा संपवून सिंहारूढ होण्यासाठी आई तुळजाभवानी झाली सज्ज!
14
अनिल अंबानींचं नशीब पालटलं, 'अच्छे दिन'ची सुरुवात? आता ₹२९३० कोटींचा फंड उभारायला मंजुरी
15
हरियाणा निवडणुकीदरम्यान राम रहीम तुरुंगातून बाहेर; २० दिवस बागपत आश्रमात राहणार
16
"२०२४ मध्ये जिंकू शकत नाही मान्य केल्यामुळे..."; अमित शाहांच्या 'त्या' विधानावर काँग्रेसचा पलटवार
17
Maharashtra Politics : '२०२९ मध्ये भाजपाचे सरकार येणार', शाहांचं विधान; अजित पवार, एकनाथ शिंदे, जयंत पाटील काय म्हणाले?
18
Iran Israel संघर्षाचा भारतीयांनाही बसणार फटका! कच्च्या तेलाच्या किंमतीचा भडका 
19
बिग बॉस ओटीटी फेम अदनान शेखने मराठी मुलीशी केलं लग्न, पत्नीने लग्नानंतर बदलला धर्म?

बीडीओंकडून वैरागड ग्रा. पं. ची चौकशी

By admin | Published: September 22, 2016 2:25 AM

येथील ग्रामविकास अधिकारी ए. एन. डाखरे हे वरिष्ठ अधिकाऱ्यांना कोणतीही लेखी, तोंडी सूचना न देता मागील १५ दिवसांपासून

ग्रामसेवक गैरहजर : आर्थिक व्यवहार ठप्पवैरागड : येथील ग्रामविकास अधिकारी ए. एन. डाखरे हे वरिष्ठ अधिकाऱ्यांना कोणतीही लेखी, तोंडी सूचना न देता मागील १५ दिवसांपासून ग्रामपंचायत कार्यालयात सतत गैरहजर राहत असल्यामुळे ग्रा. पं. ची कार्यालयीन कामे तसेच ग्रामपंचायतीचे आर्थिक व्यवहार होण्यास अडचण निर्माण झाली. ग्रामस्थांच्या तक्रारीवरून आरमोरीचे संवर्ग विकास अधिकारी ए. डी. सज्जनपवार यांनी पंचायत विस्तार अधिकारी रायपुरे यांच्यासह वैरागड ग्रामपंचायतीला भेट देऊन चौकशी केली.या चौकशीत ८ सप्टेंबर रोजी ग्रामविकास अधिकारी डाखरे वैरागड ग्रामपंचायत कार्यालयात आले होते. तेव्हापासून आजपर्यंत ग्रा. पं. कार्यालयात आले नाहीत, अशी माहिती वैरागडचे उपसरपंच श्रीराम अहिरकर, ग्रा. पं. सदस्य नल्लू आत्राम, संजय खंडारकर, नलिनी सहारे, पांडुरंग बावणकर यांनी बीडीओ सज्जनपवार यांना दिली. आम्ही गैरहजर राहण्याबद्दल डाखरे यांना विचारले असता, मी वरिष्ठांना माहिती देऊन सुटीवर आहे, असे सांगतात, अशी तक्रार ग्रा. पं. सदस्यांनी बीडीओंजवळ केली. डाखरे यांनी आर्थिक गैरव्यवहार केल्याचा आरोप यापूर्वी गावकऱ्यांनी केला असून चौकशीची मागणी करण्यात आली. मात्र या संदर्भात चौकशी झाली नाही. ग्रामविकास अधिकारी डाखरे यांना नोटीस बजावून गैरहजेरीचे कारण विचारले जाईल, दोन दिवसात डाखरे हजर न झाल्यास दुसऱ्या ग्रामसेवकाला कार्यभार देण्यात येईल, असे बीडीओंनी सांगितले. (वार्ताहर)