गडचिरोलीः भामरागडपासून १४ कि.मी. अंतरावर असलेल्या इरपनार गावात शुक्रवारी दुपारी २ च्या सुमारास नक्षल्यांनी १५ ट्रॅक्टर्स, दोन जेसीबी व एक ग्रेडरगाडी जाळून टाकल्याची खळबळजनक घटना घडली आहे.
पंतप्रधान ग्राम सडक योजनेंतर्गत धोडराज ते इरपनार दरम्यानच्या ४ कि.मी. च्या रस्त्याचे काम सुरू आहे. जवळपास २२ ते २५ वाहने या कामावर होती. त्यात काही कंत्राटदारांची तर काही स्थानिक नागरिकांची वाहने होती.
दुपारी २ ते २.३० च्या दरम्यान ४० ते ५० च्या संख्येने आलेल्या नक्षल्यांनी गावालगत खड्डा खणून त्यातील माती काढण्याचे काम करत असलेल्या वाहनांना आग लावली. यातील १० ते १५ बंदुकधारी पुढे येऊन त्यांनी ही आग लावली. या ठिकाणी लाल रंगाचा बॅनर लावून ते नंतर निघून गेले.
नक्षलवाद्यांनी रस्त्याच्या कामावरील कंत्राटदाराची तब्बल ११ वाहने जाळून टाकली. हा थरार दुपारी २ वाजताच्या सुमारास घडला. जाळलेल्या वाहनांमध्ये ९ ट्रॅक्टर आणि २ जेसीबीचा समावेश आहे.
सूरजागड प्रकल्प बंद झाला पाहिजे व मोदी सरकारच्या विरोधात विचार अशा आशयाचे बॅनर वाहने झाल्याचे ठिकाणी व गावाच्या वेशीवर बांधले होते.