शहरं
Join us  
Trending Stories
1
महाशक्तीचा महायुती, मविआच्या नाराजांवर डोळा, नेते फोडणार, १०० जागांची पहिली यादी येणार; बच्चू कडूंची घोषणा 
2
काँग्रेस निवडणुकीतून मागे हटण्याच्या तयारीत? २-५ जागांवरून बिनसले; सपा पोटनिवडणूक एकटी लढण्याची शक्यता
3
मदरसे बंद करण्याची NCPCR ची शिफारस; सर्वोच्च न्यायालयाने घेतला मोठा निर्णय
4
“कोणताही विभाग हा एका पक्षाचा नसतो”; ठाकरे गट-काँग्रेस वादावर संजय राऊत स्पष्टच बोलले
5
चंद्रकांत पाटलांविरोधात भाजपचे बालवडकर दंड थोपटणार? बाहेरचा उमेदवार पुन्हा लादला, कोथरुडमध्ये बंडखोरीचे वारे
6
मोदी सरकारमध्ये शिवराजसिंह चौहान यांचं वजन वाढलं! पंतप्रधान मोदींनी दिली मोठी जबाबदारी
7
'या' हिरो बाईकने विक्रीबाबतचे सर्व रेकॉर्ड मोडले; ही नावे आहेत टॉप-5 मध्ये...
8
मविआत नाट्यमय घडामोडी सुरु असताना, शिंदे गट शिवसेना थोड्याच वेळात पहिली यादी जाहीर करणार
9
बँक उघडण्याची वेळ बदलणार; आठवड्यातून २ दिवस सुट्टी मिळणार, काय आहे नवा नियम?
10
मविआमध्ये 'सांगोला अन् दक्षिण'चा तिढा; महायुतीत 'करमाळा अन् मध्य'मध्ये स्पर्धा
11
धक्कादायक! कोट, स्टेथोस्कोप... महिलेला डॉक्टर होण्याचे 'वेड'; डिग्रीशिवाय करत होती उपचार
12
दिवाळीपूर्वी NTPC च्या शेअरधारकांसाठी मोठं गिफ्ट! कंपनी देणार Dividend, रेकॉर्ड डेट काय?
13
धक्कादायक! करवाचौथला सासरी जाणाऱ्या महिला पोलिसावर गावाबाहेर अत्याचार; विरोध करताना दात तुटला
14
Vedanta Job News : वेदांता 'या' क्षेत्रात करणार १ लाख कोटींची गुंतवणूक; २ लाख लोकांना मिळणार रोजगार, पाहा डिटेल्स
15
आखाती देशांमध्ये १३ हजार लोकांचे नेटवर्क, हवालाद्वारे निधी... पीएफआय संदर्भात ईडीचा मोठा खुलासा
16
मविआचा जागावाटपाचा गुंता सुटेना; राज्यातील काँग्रेसच्या नेत्यांना दिल्लीत थांबण्याचे आदेश
17
३ हजार वर्षांची प्राचीनता, कालातीत अखंड परंपरा; दिवाळी नेमकी का साजरी करतात? पाहा, महात्म्य
18
‘गण गण गणात बोते’चा नेमका अर्थ काय? गजानन महाराजांनी मंत्र का दिला? अखंड जपाने मिळेल पुण्य
19
Video: रंगू कीर्तनाचे रंगी...! विराट अन् पत्नी अनुष्का कृष्णदास यांच्या कीर्तनात तल्लीन
20
नारायण राणेंचे निकटवर्तीय नवव्यांदा रिंगणात, कालिदास कोळंबकरांना भाजपकडून उमेदवारी

भोई-ढिवर समाजाचा विराट मोर्चा, घडले एकजुटीचे दर्शन, महिलांचा लक्षणीय सहभाग

By ऑनलाइन लोकमत | Published: October 05, 2024 3:58 PM

घोषणांनी शहर दणाणले : प्रलंबित मागण्यांकडे वेधले प्रशासनाचे लक्ष

लोकमत न्यूज नेटवर्क गडचिरोली : ग्रामीण भागात विखुरलेल्या मात्र विकासापासून अजूनही वंचित असलेल्या भोई, ढिवर, केवट समाजाने आपल्या विविध मागण्यांकडे शासनाचे लक्ष वेधण्यासाठी शुक्रवारी जिल्हाधिकारी कार्यालयावर धडक दिली. या मोर्चात जवळपास १५ हजार नागरिक सहभागी झाले. या समाजाचा पहिल्यांदाच एवढा मोठा मोर्चा निघाला. मोर्चेकऱ्यांच्या घोषणांमुळे मुख्य मार्ग व जिल्हाधिकारी कार्यालयाचा परिसर दणाणून गेला. मागण्या मान्य होतील किंवा नाही हा नंतरचा प्रश्न आहे. मात्र यातून या समाजाने आपली शक्ती व एकजूट शासनाला दाखवून दिली.

भोई-ढिवर व तत्सम जाती समाज संघटनेच्या नेतृत्त्वात मोर्चा काढण्यात आला. धानोरा मार्गावरील शिवाजी महाविद्यालयापासून मोर्चाला सुरुवात झाली. मोर्चात समोर होणाऱ्या नागरिकांचा जत्था एसबीआय बँकेपर्यंत पोहोचला, तरी मागचे नागरिक शिवाजी महाविद्यालयातून निघायचे होते. यावरून या मोर्चातील सहभागी नागरिकांची संख्या लक्षात येते. १० हजार नागरिकांपेक्षा अधिक नागरिक मोर्चात सहभागी होणार असल्याची माहिती आयोजकांनी दिल्याने पोलिसांनी आपली कुमक वाढवली होती. कोणतीही अनुचित घटना घडली नाही. जिल्हाधिकारी कार्यालय परिसरात झालेल्या सभेदरम्यान फक्त समाजातील व्यक्तीच उपस्थित होते. राजकीय व्यक्तींपासून या मोर्चाला दूर ठेवण्यात आले होते. 

भोई/ढिवर व तत्सम जाती संघटनेचे संयोजक क्रीष्णा मंचलवार, जिल्हाध्यक्ष प्रा. भाग्यवान मेश्राम, महिला जिल्हाध्यक्ष मिणाक्षी गेडाम, कार्याध्यक्ष सुनील बावणे, शेकाप नेते रामदास जराते, उपाध्यक्ष सुधाकर गद्दे, सचिव किशोर बावणे, कोषाध्यक्ष दुधराम सहारे, प्रसिद्धी प्रमुख फुलचंद वाघाडे, सल्लागार परशुराम सातार, मोहन मदने, जिल्हा सदस्य जयश्री जराते, ओडेवार समाजाचे जिल्हाध्यक्ष लच्चमा पानेमवार, प्रा. खेडकर, निवृत्त प्राध्यापक गेडाम यांनी मोर्चाचे नेतृत्व केले.

उन्हाची पर्वा न करता चार किमी पायी मोर्चा शिवाजी महाविद्यालय ते जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंतचे अंतर सुमारे चार किमीचे आहे. मागीचा चार दिवसांपासून ऑक्टोबर हिटचा तडाखा जानवत आहे. सकाळी आठ वाजतानंतर असह्य उकाडा जाणवत आहे. शुक्रवारीही प्रचंड उकाडा होता. या उकाड्यातही मोर्चेकऱ्यांनी चार किमीचे अंतर पायी गाठले. काही जणांनी मासेमारीची पारंपरिक साधने जाळ, धुटीसोबत आणली होती.

या आहेत मुख्य मागण्या 

  • ग्रामपंचायतीने ग्रामसभेत प्राधान्यक्रमाने मंजूर केलेल्या प्रतिक्षा यादीनुसार गरजू भोई/ढिवर/केवट व तत्सम जातीच्या लाभार्थ्यांना घरकुलाचा लाभ देण्यात यावा
  • प्रधानमंत्री आवास योजना / यशवंतराव चव्हाण मुक्त वसाहत वैयक्तिक घरकूल योजना व मोदी आवास घरकूल योजनेचा कोटा स्वतंत्ररीत्या राखीव करण्यात यावा 
  • स्वतंत्र जनगणना करून हक्काचे आरक्षण देण्यात यावे. पारंपरिक मासेमारी करणाऱ्या जातीमध्ये इतर कोणत्याही जमातींचा समावेश करू नये. उच्च शिक्षणासाठी एस.सी./एस.टी. प्रमाणे विद्यार्थ्यांना सोयी-सुविधा उपलब्ध करून देण्यात याव्या. प्रत्येक तालुक्यात वस्तीगृह निर्माण करण्यात यावे.
  • ग्रामपंचायतींना हस्तांतरीत झालेले अनुसूचित क्षेत्रातील (पेसा) १०० हेक्टर खालील तलाव ग्राम विकास विभाग शासन परिपत्रक दि. ३० डिसेंबर २०२० प्रमाणे नोंदणीकृत मच्छिमार सहकारी संस्थांना साइटला भेट द्या वाटाघाटीने लिजवर देण्यात यावे, आदी मागण्यांसाठी आंदोलन करण्यात आले.
टॅग्स :Gadchiroliगडचिरोली