ओबीसी व मराठा यांच्यामध्ये तेढ निर्माण केली. भाजपच्या काळात मराठ्यांना आरक्षण मिळू शकले नाही. गडचिराेली जिल्ह्यातील ओबीसी समाजाचे शैक्षणिक, सामाजिक व राजकीय आरक्षण पूर्ववत करू, असे आश्वासन २०१४ च्या लाेकसभा व विधानसभा निवडणूक प्रचारादरम्यान केंद्रीय मंत्री नितीन गडकरी व माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले हाेते. पाच वर्षे सत्ता उपभाेगली; मात्र ओबीसी समाजाचे आरक्षण पूर्ववत करू शकले नाही, असा आराेप डाॅ. उसेंडी यांनी केला आहे. याउलट काँग्रेसने नेहमीच आरक्षणाची बाजू मांडली आहे, असे मत व्यक्त केले. पत्रकार परिषदेला ओबीसी जिल्हाध्यक्ष पांडुरंग घाेटेकर, शहराध्यक्ष सतीश विधाते, हसन गिलानी, पंकज गुड्डेवार आदी उपस्थित हाेते.
बाॅक्स
१७ टक्के आरक्षण मिळण्यात वडेट्टीवारांचा महत्त्वाचा वाटा
गडचिराेली जिल्ह्यातील ओबीसींचे आरक्षण ६ टक्क्यांवरून १७ टक्के करण्याचा निर्णय राज्याच्या मंत्रिमंडळाने १५ सप्टेंबर राेजी घेतला आहे. आरक्षण वाढविण्यात राज्याचे बहुजन कल्याण व मदत, पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार यांनी महत्त्वाची भूमिका बजावली आहे, अशी माहिती डाॅ. उसेंडी यांनी दिली.