लोकमत न्यूज नेटवर्कगडचिरोली : अहेरीत नगराध्यक्ष पदी भाजपच्या हर्षा ठाकरे व उपाध्यक्ष पदी कमला पडगेलवार, मुलचेरात नगराध्यक्ष पदी राकाँचे दीपक परचाके व उपाध्यक्ष पदी वनिता आलाम, कोरची नगर पंचायतीत अध्यक्ष पदी भाजपच्या ज्योती नैताम तर उपाध्यक्षपदी कमलनारायण खंडेलवाल, तसेच एटापल्ली नगर पंचायतीत काँग्रेसच्या दीपयंती पेंदाम तर उपाध्यक्षपदी रमेश गंपावार निवडून आले. धानोरा नगर पंचायतीत भाजपच्या लिना साईनाथ साळवे यांची अध्यक्ष पदी तर उपाध्यक्षपदी बाळू उंदीरवाडे निवडून आले. पाच नगर पंचायतीच्या अध्यक्ष व उपाध्यक्ष पदाच्या निवडणुकीत भाजपने वर्चस्व मिळविले.अहेरी : अहेरी नगर पंचायतीत नगराध्यक्ष म्हणून भाजपाच्या वर्षा ठाकरे यांची निवड झाली आहे. त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या अर्चना विरगोणवार यांचा ११ विरूध्द पाच मतांनी पराभव केला. उपाध्यक्ष म्हणून भाजपाच्याच कमलाताई पडगेलवार या निवडून आल्या. त्यांनी राष्टÑवादी काँग्रेसच्या शैलेश पटवर्धन यांचा पराभव केला. अहेरी नगर पंचायतीच्या अध्यक्ष व उपाध्यक्ष पदाची निवडणूक पालकमंत्र्यांनी प्रतिष्ठेची केली होती. मागील दोन दिवसांपासून ते अहेरीत ठाण मांडून बसले होते. राकाँचा एक व इतर दोन नगरसेवकांना आपल्या खेम्यात खेचला. निकाल जाहीर होताच भाजपच्या कार्यकर्त्यांनी नगर पंचायत समोर फटाक्यांची आतिषबाजी केली. पालकमंत्र्यांनी नवनियुक्त नगराध्यक्ष व उपाध्यक्ष यांचा सत्कार केला. यावेळी भाजपा अहेरी तालुका अध्यक्ष रवी नेलकुद्री, भाजपा युवा मोर्चा, जिल्हा उपाध्यक्ष अमोल गुडेलीवार, अहेरी शहर अध्यक्ष नितेश नामेवार, शंकर मगडीवार, माजी नगराध्यक्ष प्राजक्ता पेदापल्लीवार, माजी उपाध्यक्ष अन्नपूर्णा सिडाम, नगरसेवक श्रीनिवास चटारे, नारायण सिडाम, मालू तोडसाम, रेखा सडमेक, सुनिता येमुलवार, कबीर शेख, संजय झाडे, गिरीष मद्देर्लावार, रवींद्र ठाकरे, दिलीप पडगेलवार, शेषराव दिवसे, संतोष येमुलवार, गुड्डू इाकरे, सरफराज आलम, राकेश गुडेल्लीवार, दिनेश येनगंटीवार, पवन गदेवार, प्रणय एगलोपवार यांच्यासह भाजपचे पदाधिकारी हजर होते.मुलचेरा : मुलचेरा नगर पंचायतीच्या नगराध्यक्ष पदी राष्ट्रवादी काँग्रेसचे दीपक परचाके तर उपाध्यक्ष म्हणून राष्ट्रवादी काँग्रेसच्या वनिता आलाम यांची निवड झाली. मुलचेरा नगर पंचायतीत एकूण १७ सदस्यांपैकी ११ सदस्य राकाँचे, भाजपाचे तीन, काँग्रेसचे दोन व अपक्ष एक उमेदवार आहे. अध्यक्ष पदासाठी माजी नगराध्यक्ष सुभाष आत्राम, दीपक परचाके यांचे नामांकन दाखल झाले होते. अपक्ष उमेदवार सुनिता कुसनाके यांनीही नामांकन अर्ज दाखल केले होते. मात्र सुभाष आत्राम यांनी अर्ज मागे घेतला. त्यामुळे त्यामुळे दीपक परचाके व सुनिता कुसनाके यांच्यात लढत झाली. दीपक परचाके यांना १३ मते मिळाली. तर सुनिता कुसनाके यांना चार मते मिळाली. उपाध्यक्ष पदाकरिता वनिता आलाम यांचा एकमेव नामांकन अर्ज दाखल झाल्याने त्यांची बिनविरोध निवड झाली. पीठासीन अधिकारी म्हणून उपविभागीय अधिकारी नितीन सदगीर यांनी काम पाहिले. यावेळी मुख्याधिकारी समशेर पठाण हजर होते. विजयानंतर जल्लोष करण्यात आला. यावेळी राकाँचे तालुकाध्यक्ष हरीपद पांडे, शहर अध्यक्ष मनोज कर्मकार, मनोज बंडावार, जि.प. सदस्य युध्दिष्टीर बिश्वास, रवींद्र शहा, विष्णू रॉय, नगरसेवक अब्दुल लतीफ शेख हजर होते.कोरची : कोरची नगर पंचायतीच्या अध्यक्ष व उपाध्यक्ष पदासाठी घेण्यात आलेल्या विशेष सभेत काँग्रेसचे फितूर नगरसेवक मेघशाम जमकातन हे सभेला उपस्थित राहिले नाही. त्यामुळे नगराध्यक्ष पदाच्या निवडणुकीत शिवसेना पक्षातून निवडून आलेल्या व भाजपात प्रवेश केलेल्या ज्योतीबाई नैताम या नगराध्यक्ष पदावर निवडून आल्या. उपाध्यक्ष पदी भाजपाचे कमलनारायण खंडेलवाल यांची निवड झाली. कोरची नगर पंचायतीत भाजपाचे आठ, काँग्रेसचे तीन, राकाँचे दोन व नगर विकास आघाडीचे तीन नगरसेवक आहेत. ईश्वर चिठ्ठीने अध्यक्ष व उपाध्यक्ष ठरेल असे वाटत असतानाच काँग्रेसचे मेघशाम जमकातन हे सभेला उपस्थित झाले नाही. त्यामुळे भाजपचे आठ तर विरोधात सात नगरसेवक झाले. परिणामी नगराध्यक्ष व उपाध्यक्ष पदी भाजपाचेच उमेदवार निवडून आले. कोरची नगर पंचायतमधील एक जागा मागील दीड वर्षांपासून रिक्त आहे.एटापल्ली : एटापल्ली नगर पंचायतीच्या नगराध्यक्ष पदी दीपयंती पेंदाम व उपाध्यक्ष पदी रमेश गंपावार यांची निवड झाली आहे. नगराध्यक्ष व उपाध्यक्ष पदाची निवडणूक यावेळी रंगतदार झाली. राकाँच्या नगरसेविका सगुणा हिचामी या मतदानासाठी येत असताना थोडीफार खिचातानी झाली. ठाणेदार सचिन जगताप यांनी परिस्थिती नियंत्रणात ठेवली. मागील निवडणुकीत नगराध्यक्ष पदी राकाँच्या सरीता राजकोंडावार व उपाध्यक्ष पदी काँग्रेसचे रमेश गंपावार निवडून आले. यावेळी काँग्रेस व राकाँत एकमत झाले नाही. परंतु राकाँच्या तीन नगरसेवकांपैकी दोन सदस्य आपल्याकडे ठेवण्यास काँग्रेस यशस्वी ठरली. त्यामुळे काँग्रेसचा पारडा जड होता. यावेळी अनुसूचित जमाती महिलेकरिता नगराध्यक्षाचे पद राखीव होते. काँग्रेसकडून नगराध्यक्ष पदाकरिता दीपयंती पेंदाम तर आविसंतर्फे किरण लेकामी यांनी नामांकन भरले. उपाध्यक्ष पदाकरिता काँग्रेसतर्फे रमेश गंपावार तर भाजपातर्फे दीपक सोनटक्के यांनी नामांकन भरले. काँगे्रस व राकाँचे मिळून काँग्रेसकडे १० नगरसेवक होते. त्यामुळे काँग्रेसचाच नगराध्यक्ष व उपाध्यक्ष बनला. काँग्रेसचे गंपावार यांना दुसऱ्यांदा संधी मिळाली आहे. यापूर्वीही ते उपाध्यक्ष होते. गंपावार हे अनेक वर्षांपासून राजकारणात आहेत. पीठासीन अधिकारी म्हणून एसडीएम अतुल चोरमारे, सहायक पीठासीन अधिकारी म्हणून मुख्याधिकारी एस. एम. सिलमवार होते. या निवडणुकीत काँग्रेसचे तालुकाध्यक्ष तथा जिल्हा परिषद सदस्य संजय चरडुके यांनी महत्त्वाची भूमिका बजावली.धानोरा : धानोरा नगर पंचायतीत भाजपच्या लिना साईनाथ साळवे यांची अध्यक्ष पदी तर उपाध्यक्षपदी बाळू उंदीरवाडे निवडून आले. पाच नगर पंचायतीच्या अध्यक्ष व उपाध्यक्ष पदाच्या निवडणुकीत भाजपने वर्चस्व मिळविले.आता जिल्ह्यातील उर्वरित कुरखेडा, चामोर्शी, भामरागड व सिरोंचा या चार नगर पंचायतीमध्ये २९ मे रोजी निवडणूक होणार आहे.
नगर पंचायतींवर भाजपचे वर्चस्व
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 26, 2018 12:50 AM
अहेरीत नगराध्यक्ष पदी भाजपच्या हर्षा ठाकरे व उपाध्यक्ष पदी कमला पडगेलवार, मुलचेरात नगराध्यक्ष पदी राकाँचे दीपक परचाके व उपाध्यक्ष पदी वनिता आलाम, कोरची नगर पंचायतीत अध्यक्ष पदी भाजपच्या ज्योती नैताम तर उपाध्यक्षपदी कमलनारायण खंडेलवाल, तसेच एटापल्ली नगर पंचायतीत काँग्रेसच्या दीपयंती पेंदाम तर उपाध्यक्षपदी रमेश गंपावार निवडून आले.
ठळक मुद्देअनेक ठिकाणी नगरसेवक फुटले : अहेरी, कोरची व धानोरात भाजप, मुलचेरात राकाँ व एटापल्लीत काँग्रेसची सत्ता