शहरं
Join us  
Trending Stories
1
भाजपच्या अभूतपूर्व यशाचे ‘रहस्य’ काय?; 'सागर' बंगल्यावर पडद्यामागे घडलेल्या गोष्टी
2
मुख्यमंत्रि‍पदाचा निर्णय झाला का? बैठकीनंतर एकनाथ शिंदेंनी दिली महत्त्वाची माहिती
3
महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रिपदी काेण? दिल्ली दरबारी अडीच तास खलबते; २ डिसेंबरला शपथविधी!
4
'ट्रम्प परत येताहेत'; बांगलादेशातील हिंदुवरील हल्ल्यांवर मूर यांचे विधान
5
अस्थिर बाजारात गुंतवणूकीची भीती वाटतेय? 'या' ५ पर्यायांचा विचार करा; टेन्शनशिवाय मिळेल प्रॉफिट
6
मुख्यमंत्रिपदाच्या बदल्यात शिंदेंनी गृहमंत्रालयासह एवढ्या मंत्रिपदांची केली मागणी, भाजपाकडून असा प्रतिसाद
7
१ डिसेंबरपासून ५ मोठे बदल होणार; सर्वसामान्यांच्या खिशावर परिणाम होणार, वाचा सविस्तर
8
Today Daily Horoscope: जाणून घ्या, कसा असेल आजचा दिवस, काय सांगते तुमची राशी?
9
Tata Sons वर गंभीर आरोप, RBI ला कायदेशीर नोटीस... काय आहे संपूर्ण प्रकरण?
10
उत्तरेतील वारे, महाराष्ट्र गारठला; अनेक शहरांचा पारा आला १५ अंश सेल्सिअसखाली 
11
पदवी अभ्यासक्रम अवधी कमी-जास्त करता येणार; विद्यार्थ्यांसाठी UGC ची नवीन योजना काय?
12
कुजबुज! निकाल लागले, आचारसंहिता संपली तरीही विजयी मिरवणूक नाही, कारण... 
13
नव्या ‘एलएनजी’ बस मुंबईत धावणार की नाशिकमध्ये?; प्रतिगाडी ५.१५ लाखांचा खर्च अपेक्षित
14
कोस्टल रोडचा खर्च १३०० कोटींनी वाढला; एकूण खर्च गेला १४ हजार काेटींवर
15
धक्कादायक! ‘लिव्ह-इन पार्टनर’चे केले ५० तुकडे अन् प्राण्यांना खाण्यासाठी टाकले
16
समुद्रतळातून काढला तब्बल ३०० किलो प्लास्टिक कचरा; भारतातील पहिलाच प्रयोग मालवणमध्ये यशस्वी
17
जमीन व्यवहारातील फसवणूक आता टळणार; राज्यात 'ॲग्रिस्टॅक' योजना राबवणार
18
वांद्रे रेल्वे स्थानकालगतची ४५ अनधिकृत बांधकामे जमीनदोस्त; प्रशासनाची धडक कारवाई 
19
सोशल मीडियाच्या राक्षसाने मुलांना गिळू नये, म्हणून...

भाजप सरकार कामगार विरोधी

By admin | Published: May 01, 2017 2:14 AM

सध्याचे भाजपप्रणित केंद्र व राज्य सरकार हे कामगार, कष्टकरी व शेतकरीविरोधी असून भांडवलदाराच्या हितासाठी काम करणारे सरकार आहे.

श्याम काळे यांचा आरोप : आयटकचे जिल्हा अधिवेशन गडचिरोली : सध्याचे भाजपप्रणित केंद्र व राज्य सरकार हे कामगार, कष्टकरी व शेतकरीविरोधी असून भांडवलदाराच्या हितासाठी काम करणारे सरकार आहे. त्यामुळे सर्वसामान्यांना जीवन जगणे कठीण झाले आहे. त्यामुळे कामगारांनी एकत्र येऊन संघर्ष केला पाहिजे, असे प्रतिपादन आयटकचे राज्य सचिव श्याम काळे यांनी केले. आयटकचे दुसरे जिल्हा अधिवेशन गडचिरोली येथे रविवारी पार पडले. यावेळी ते बोलत होते. याप्रसंगी मंचावर अंगणवाडी, बालवाडी कर्मचारी युनियनच्या राज्य सरचिटणीस अ‍ॅड. माधुरी क्षिरसागर, डॉ. महेश कोपुलवार, देवराव चवळे, विनोद झोडगे, जलील खान पठाण, बी. के. नाकतोडे आदी उपस्थित होते. याप्रसंगी माधुरी क्षिरसागर म्हणाल्या, सध्याचे सरकार हे महिला विरोधी असून आयटक ही संघटना केवळ कामगारांच्या मानधन वाढीसाठी लढणारी संघटना नसून समाजातील अत्याचार, शोषण, भ्रष्टाचार चव्हाट्यावर आणणारी संघटना आहे. डॉ. महेश कोपुलवार म्हणाले, लोकशाही मार्गाने आपल्या हक्कासाठी संघर्ष करणाऱ्यावर पोलीस प्रशासनाकडून दडपशाहीचे धोरण अवलंबिले जात आहे. हे लोकशाहीविरोधी आहे, असे ते म्हणाले. अधिवेशनाच्या सुरूवातीला इंदिरा गांधी चौकातून पोटेगाव मार्गावरील गोंडवाना कलादालनापर्यंत रॅली काढण्यात आली. कार्यक्रमाचे प्रास्ताविक देवराव चवळे, संचालन विनोद झोडगे यांनी केले तर आभार अ‍ॅड. जगदिश मेश्राम यांनी मानले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी सपना रामटेके, रूपा पेंदाम, कौसल्या गोंधोळे, बसंती अंबादे, कुंदा चलिरवार, रजनी गेडाम, किरण गजभिये, विनोद बन्सोड, लता नंदेश्वर, प्रकाश ठलाल आदींनी सहकार्य केले. याप्रसंगी आयटकची गडचिरोली जिल्हा कार्यकारीणी घोषीत करण्यात आली. सदर अधिवेशनात देवराव चवळे, विनोद झोडगे यांनी संघटनेचा अहवाल मांडला. तसेच याप्रसंगी ग्रामसभेचे जि.प. सदस्य अ‍ॅड. लालसू नरोटी यांचा सत्कार करण्यात आला. कार्यक्रमाला आयटकचे पदाधिकारी, सदस्य तसेच अंगणवाडी सेविका व मदतनिस मोठ्या संख्येने उपस्थित होत्या. (स्थानिक प्रतिनिधी)