आॅनलाईन लोकमतगडचिरोली : जिल्हा काँग्रेस कमिटीच्या वतीने २६ जानेवारीला स्थानिक इंदिरा गांधी चौकात ‘लोकतंत्र बचाओ, संविधान बचाओ’ रॅली काढून भाजप सरकारचा निषेध करण्यात आला.केंद्र व राज्य शासनाच्या काही निर्णयांमुळे भारतीय राज्य घटनेला धक्का बसेल, अशी शंका सर्वसामान्य नागरिकांमध्ये निर्माण झाली आहे. देशाची धर्मनिरपेक्षता धोक्यात आली आहे. आजची परिस्थिती लक्षात घेता संविधान धोक्यात आले आहे, असा आरोप करीत जिल्हा काँग्रेस कमिटी कार्यालयातून इंदिरा गांधी चौकात मोर्चा काढण्यात आला. चौकात येऊन सरकारच्या विरूद्ध घोषणा देण्यात आल्या. याप्रसंगी माजी खा. मारोतराव कोवासे, जिल्हा काँग्रेस कमिटी अध्यक्ष माजी आ. डॉ. नामदेव उसेंडी, हसनअली गिलानी, जि. प. सदस्य अॅड. राम मेश्राम, महासचिव प्रभाकर वासेकर, तालुकाध्यक्ष शंकर सालोटकर, समशेर पठाण, शहर अध्यक्ष सतीश विधाते, पंकज गुड्डेवार, पांडुरंग घोटेकर, पी. टी. मसराम, नंदू वाईलकर, रामदास टिपले, लहुकुमार रामटेके, बाबुराव बावणे, महादेव भोयर, तुळशीदास भोयर, रजनीकांत मोटघरे, तौफिक शेख, नीतेश राठोड, राकेश रत्नावार, जितू मुनघाटे, सुभाष धाईत, भाष्कर नरूले, राजू आखाडे, नीलिमा राऊत, अपर्णा खेवले, रोहिणी मसराम, बबीता उसेंडी, दर्शना लोणारे, कल्पना नंदेश्वर हजर होत्या.
भाजप सरकारचा निषेध
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 27, 2018 11:01 PM
जिल्हा काँग्रेस कमिटीच्या वतीने २६ जानेवारीला स्थानिक इंदिरा गांधी चौकात ‘लोकतंत्र बचाओ, संविधान बचाओ’ रॅली काढून भाजप सरकारचा निषेध करण्यात आला.
ठळक मुद्देसंविधान बचाओ रॅली : जिल्हा काँग्रेसची इंदिरा गांधी चौकात निदर्शने