भारतीय जनता पक्षाच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालयासमोर महाविकास आघाडी सरकारच्या विरोधात घोषणाबाजी करून आघाडी सरकारचा निषेध करण्यात आला. त्यानंतर जिल्हाधिकाऱ्यांमार्फत राष्ट्रपती व राज्यपालांना निवेदन पाठविण्यात आले.
यावेळी जिल्हा महामंत्री गोविंद सारडा, प्रमोद पिपरे, जिल्हा संपर्कप्रमुख सदानंद कुथे, नगराध्यक्ष योगिता पिपरे, किसान आघाडीचे प्रदेश कार्यकारिणी सदस्य रमेश भुरसे, आदिवासी आघाडीचे प्रदेश महामंत्री प्रकाश गेडाम, भाजप शहराध्यक्ष मुक्तेश्वर काटवे, अनिल पोहनकर, डॉ भारत खटी, जिल्हा सचिव आनंद गण्यारपवार, चामोर्शी तालुकाध्यक्ष दिलीप चलाख, महामंत्री साईनाथ बुरांडे, नगरपरिषद उपाध्यक्ष अनिल कुनघाडकर, नगरसेविका वर्षा नैताम, नीता उंदीरवाडे, सागर कुंभरे, राजू शेरकी, महामंत्री विनोद देवोजवार, भाजप पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.
५ व ६ जुलैला महाराष्ट्र राज्य विधिमंडळाचे दोनदिवसीय अधिवेशन आहे. मात्र या अधिवेशनात राज्यातील कोणत्याही समस्या व प्रश्नांवर चर्चा करण्यात येणार नाही. विधिमंडळ सदस्यांना घटनेने दिलेल्या अधिकारांच्या प्रश्नांना साधे उत्तर न देता त्यांना व्यपगत केलेले आहे. राज्यातील कोणत्याही गंभीर संकटावर तसेच प्रश्नावरदेखील साधी चर्चा होणार नाही. ही एकप्रकारे लोकशाहीची मोठी क्रूर थट्टाच आहे, असे पदाधिकाऱ्यांनी म्हटले.
बाॅक्स
लाेकशाही वाचवा दिन पाळणार
काेराेनामुळे अनेक समस्या निर्माण झाल्या. सदर समस्या विधिमंडळात मांडून सर्वसामान्यांना न्या देण्याचा प्रयत्न सदस्यांकडून केला जाणार हाेता; परंतु त्यांना समस्या मांडण्याची संधी न देणे हे निषेधार्ह आहे. लोकशाहीची हत्या करणाऱ्या महाविकास आघाडी सरकारचा भारतीय जनता पार्टी जिल्हा शाखेच्यावतीने तीव्र निषेध आहे. आजपासून ५ जुलै हा दिवस ‘महाराष्ट्रातील लोकशाही वाचवा दिन’ म्हणून आम्ही पाळणार आहोत, असे जिल्हाध्यक्ष किशन नागदेवे यांनी सांगितले.
050721\05gad_1_05072021_30.jpg
महाविकास आघाडी सरकारचा निषेध नाेंदविताना भाजप पदाधिकारी.