कार्यक्रमात भाजप महिला आघाडीच्या जिल्हाध्यक्ष योगीता भांडेकर, नगराध्यक्ष योगीता पिपरे, महिला आघाडीच्या तालुकाध्यक्ष दुर्गा काटवे, शहराध्यक्ष कविता उरकुडे, महामंत्री वैष्णवी नैताम, माजी नगरसेविका वर्षाताई शेडमाके यांच्यासह उपस्थित महिला पदाधिकाऱ्यांनी आ. डॉ. देवराव होळी, महामंत्री गोविंद सारडा, प्रशांत वाघरे, रमेश भुरसे, शहराध्यक्ष मुक्तेश्वर काटवे, नगर परिषद उपाध्यक्ष अनिल कुनघाडकर, तालुकाध्यक्ष रामरतन गोहणे, उपसभापती विलास दशमुखे, अनिल पोहनकर, अविनाश महाजन, महामंत्री हेमंत बोरकुटे, संपर्कप्रमुख विलास भांडेकर, युवा मोर्चा शहर अध्यक्ष सागर कुंभरे, हर्षल गेडाम, राजू शेरकी तसेच उपस्थित पदाधिकारी व कार्यकर्त्यांना राखी बांधून हा उत्सव साजरा केला. भाजप हा एक कुटुंब असून या कुटुंबातील सर्व सदस्यांच्या सुरक्षेची जबाबदारी प्रत्येकाची आहे. त्या सुरक्षेच्या बंधनाचे प्रतीक म्हणजे रक्षाबंधन हाेय, असे प्रतिपादन आ. डॉ. देवराव होळी यांनी केले.
भाजप महिला आघाडी पदाधिकाऱ्यांनी साजरे केले रक्षाबंधन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 26, 2021 04:38 IST