आॅनलाईन लोकमतसिरोंचा : तालुक्यातील रेगुंठा येथील एका वयोवृद्ध महिलेच्या घराला आग लागल्याने तिचे घर जळून खाक झाल्याची घटना बुधवारी रात्री घडली.दुर्गम्मा वासानिवार ही वयोवृद्ध महिला एकटीच राहत होती. कामानिमित्त बुधवारी ती बाहेरगावी गेली होती. दरम्यान बुधवारी रात्री ८ वाजताच्या सुमारास तिच्या घराला अचानक आग लागली. घरातून आग निघत असल्याचे लक्षात आल्यानंतर गावकऱ्यांनी आग विझविण्याचा प्रयत्न केला. मात्र आग आटोक्यात आली नाही. या आगीने रौद्ररूप धारण केल्याने संपूर्ण घर जळून खाक झाले. वयोवृद्ध महिला बाहेरगावी गेली असल्याने सुदैवाने जीवितहानी झाली नाही. मात्र यामध्ये तिच्या घरातील संपूर्ण वस्तू जळून खाक झाल्या. सदर महिला जवळपास ६० वर्षांची आहे. घरातील संपूर्ण सामान, दैनंदिन वापराच्या वस्तू तसेच अन्नधान्य जळाले आहेत. त्यामुळे जीवन कसे जगावे, असा प्रश्न निर्माण झाला आहे. घटनेची माहिती तलाठी यांना देण्यात आली आहे. सदर महिलेला आर्थिक मदत देण्यात यावी, अशी मागणी होत आहे.आग लागण्याचे नेमके कारण कळाले नाही. घरातील साहित्य जळून खाक झाल्याचे पाहून सदर महिलेची प्रकृतीच बिघडली. त्यामुळे तिला रुग्णालयात भरती केले आहे.
धगधगत्या आगीत घर खाक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 08, 2018 10:41 PM
तालुक्यातील रेगुंठा येथील एका वयोवृद्ध महिलेच्या घराला आग लागल्याने तिचे घर जळून खाक झाल्याची घटना बुधवारी रात्री घडली.
ठळक मुद्देरेगुंठा येथील घटना : साहित्य व अन्नधान्य जळाले