कार्यक्रमाला मनोहरभाई शिक्षण प्रसारक मंडळाच्या अध्यक्ष सुनीता वनमाळी, संस्थेचे सचिव मनोज वनमाळी, उपाध्यक्ष नूरअल्ली पंजवानी, सहकार नेते प्रकाश पोरेड्डीवार, काँग्रेसचे ज्येष्ठ नेते सुधीर भातकुलकर, माजी आमदार आनंदराव गेडाम, युवक काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष महेंद्र ब्राह्मणवाडे, काँग्रेसचे माजी अध्यक्ष हसन गिलानी, काँग्रेस अनुसूचित जाती सेलचे अध्यक्ष रजनीकांत मोटघरे, माजी पं. स. सभापती अशोक वाकडे, नगरसेवक मिलिंद खोब्रागडे, कोषाध्यक्ष हरिश्चंद्र बोंदरे, दीपक बहरे, नामदेवराव सोरते, उमाकांत वनमाळी, अशोक वनमाळी, दीपक वनमाळी, प्रकाश भोयर, गीता गारोदे, राजू गारोदे, मयूर वनमाळी, प्राचार्य डॉ. लालसिंग खालसा, प्राचार्य साईनाथ अद्दलवार, उपप्राचार्य डॉ. चंद्रकांत डोर्लीकर उपस्थित होते. याप्रसंगी स्व. किशोर वनमाळी यांच्या प्रतिमेला माल्यार्पण करून आदरांजली वाहून दोन मिनिटे मौन पाळण्यात आले. रक्तदान शिबिरासाठी वैद्यकीय अधिकारी डॉ. भूषण नखाते, पीआरओ सतीश तडकलावार, तंत्र सहायक विवेक घोणाडे, चाैधरी, नीलेश सोनवणे, वसंत नन्हे यांनी सहकार्य केले. दरम्यान, एचबी, ब्लड ग्रुप, सीबीसी, थायराॅईड, एलएफटी, केएफटीची चाचणी करण्यात आली.
एमजी काॅलेजमध्ये ३६ जणांचे रक्तदान
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 13, 2021 4:41 AM