या शिबिरात रक्तदान करण्यासाठी जिल्हा पोलीस दलाचे जवान, राज्य राखीव पोलीस दलाचे जवान आणि केंद्रीय राखीव पोलीस दलाच्या जवानांसह गडचिरोली शहरातील आणि परिसरातील विविध क्षेत्रात कार्यरत नागरिक सरसावत आहेत. २ जुलैला गडचिरोलीतील शिबिरानंतर जिल्ह्याच्या इतर भागात रक्तदान शिबिर होणार आहे.
पोलीस हॉस्पिटलमध्ये सकाळी १० वाजतापासून सुरू होणाऱ्या शिबिरात शारीरिक अंतर आणि मास्क यासारख्या कोरोनाच्या नियमांचे तंतोतंत पालन केले जाणार आहे. इच्छुक रक्तदात्यांनी मास्क लावूनच यायचे आहे.
(बॉक्स)
रक्तदात्यांना मिळणार प्रमाणपत्र व कार्ड
या शिबिरात जिल्हा सामान्य रुग्णालयाची चमू रक्त संकलनासाठी येणार आहे. ऐच्छिक रक्तदान करणाऱ्या या शिबिरातील सर्व रक्तदात्यांना रक्तपेढीकडून प्रमाणपत्र आणि रक्तदानाचे कार्ड मिळणार आहे. गरजवंताला रक्त देण्यासाठी ते कार्ड उपयुक्त ठरणार आहे. यामुळे अनेकांना जीवदान मिळणार आहे. सामाजिक दायित्वातून जास्तीत जास्त नागरिकांनी या रक्तदानाच्या महान कार्यात सहभागी व्हावे, असे आवाहन पोलीस विभागासह लोकमत परिवाराने केले आहे.
(बॉक्स)
शिबिरांची तारीख आणि स्थळ
१) २ जुलै - पोलीस हॉस्पिटल, पोलीस कॉलनी, कॉम्प्लेक्स गडचिरोली
२) ५ जुलै - साई नर्सिंग स्कूल, नागपूर रोड, आरमोरी
३) ६ जुलै - ग्रामीण रुग्णालय, आष्टी रोड, चामोर्शी
४) ११ जुलै - जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक, गडचिरोली