लोकमत न्यूज नेटवर्कघोट : येथे चार वर्षापूर्वी महसूल मंडळ कार्यालयाच्या इमारतीचे बांधकाम करण्यात आले. परंतु अल्पावधीतच या इमारतीला भेगा पडल्या असून टाईल्ससुद्धा आतमध्ये दबली आहे. येथे पिण्याच्या पाण्याच्या सोयीचासुद्धा अभाव असल्याने बाहेरगावाहून येणाऱ्या शेतकऱ्यांना त्रास सहन करावा लागत आहे.शेतकऱ्यांच्या सोयीसाठी घोट येथे चार वर्षापूर्वी महसूल मंडळ कार्यालयाच्या इमारतीचे बांधकाम पूर्ण झाले. परंतु सध्या इमारतीला ठिकठिकाणी भेगा पडल्या आहेत. तसेच फ्लोअरवरील टाईल्स तीन ते चार इंच आतमध्ये दबल्या आहेत. चार वर्षानंतरही संकुलात पाण्याची सोय झाली नाही. इमारतीच्या आवारात बोअरवेल आहे. परंतु चार वर्षांपासून पाण्याची मोटार, केसिंग व केबल जळाल्याने पाणी पुरवठा होत नाही त्यामुळे संकुलात काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांना तसेच बाहेरून येणाऱ्या शेतकऱ्यांना अडचणींचा सामना करावा लागत आहे. मंडल संकुलामध्ये मंडल अधिकारी तसेच तलाठी कार्यालये आहेत. या ठिकाणीसुद्धा अन्य सोयीसुविधा नाही.शौचासाठी कर्मचाऱ्यांना जावे लागते बाहेरघोट येथील मंडळ महसूल कार्यालयातील मोटार नादुरूस्त असल्याने सध्या पाण्याची सोय उपलब्ध नाही. त्यामुळे येथे कार्यरत कर्मचाऱ्यांना बाहेर शौचास जावे लागते. बाहेरून कामानिमित्त आलेल्या शेतकऱ्यांनाही अनेक अडचणींचा सामना करावा लागतो. परंतु येथील इमारतीची दुरूस्ती व सोयीसुविधा पुरविण्याकडे संबंधित विभागाचे दुर्लक्ष होत आहे.
मंडळ कार्यालयाला पडल्या भेगा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 29, 2020 5:00 AM
शेतकऱ्यांच्या सोयीसाठी घोट येथे चार वर्षापूर्वी महसूल मंडळ कार्यालयाच्या इमारतीचे बांधकाम पूर्ण झाले. परंतु सध्या इमारतीला ठिकठिकाणी भेगा पडल्या आहेत. तसेच फ्लोअरवरील टाईल्स तीन ते चार इंच आतमध्ये दबल्या आहेत. चार वर्षानंतरही संकुलात पाण्याची सोय झाली नाही. इमारतीच्या आवारात बोअरवेल आहे.
ठळक मुद्देघोट येथील प्रकार : जमीन दबल्याने टाईल्स फुटल्या, बांधकामावर प्रश्नचिन्ह