लोकमत न्यूज नेटवर्कचामोर्शी : जिल्ह्यात कापूस पिकाखालील लागवडीचे क्षेत्र दरवर्षी वाढत आहे. शेतकरी अधिकाधिक उत्पादन घेण्याचा प्रयत्न करीत असतानाच कपाशीवर गुलाबी बोंडअळी व अन्य रोगांचा प्रादुर्भाव होत असल्याने शेतकऱ्यांना तोटा सहन करावा लागतो. कपाशीवरील गुलाबी बोंडअळीचे एकात्मिक व्यवस्थापन व्हावे, या दृष्टीने चामोर्शी येथे बुधवारी कपाशीवरील गुलाबी बोंड अळीचे एकात्मिक व्यवस्थापन या विषयावर कार्यक्रम घेऊन मार्गदर्शन करण्यात आले.आदिवासी उपयोजनेंतर्गत कृषी विज्ञान केंद्र गडचिरोली आणि सीआयसीआर नागपूर यांच्या संयुक्त विद्यमाने कृषी उत्पन्न बाजार समिती नजीकच्या शिक्षक सभागृहात शेतकरी प्रशिक्षण आयोजित करण्यात आले. याप्रसंगी सीआयसीआरचे डॉ. एस. एम. वासनीक, डॉ. विनिता गोतमारे, डॉ. बाबासाहेब फंड, डॉ. दीपक नगराळे, डॉ. सलामे, कृषी विज्ञान केंद्राचे कार्यक्रम समन्वयक डॉ. संदीप कºहाळे, विषय विशेषज्ज्ञ ज्ञानेश्वर ताथोड, तालुका कृषी अधिकारी व्ही. ए. राजपूत, आत्माचे हेमंत उंदीरवाडे उपस्थित होते.संदीप कºहाळे यांनी प्रास्ताविकातून कापसाची वाढती मागणी लक्षात घेता उत्पादनात वाढ करणे आणि अधिक उत्पन्न मिळविण्याकरिता कापूस लागवड करणे आवश्यक असल्याचे प्रतिपादन केले. डॉ. विनिता गोतमारे यांनी कापूस उत्पादनाच्या विविध संधी, बाजारपेठ याविषयी मार्गदर्शन केले.डॉ. बाबासाहेब फंड यांनी गुलाबी बोंडअळीचा प्रादुर्भाव कमी करण्यासाठी दक्षता आणि उपाययोजना सांगितल्या. तालुक्यातील घारगाव, मार्र्कंडा, भेंडाळा येथील कापसाच्या शेतीला भेट देऊन प्रात्यक्षिकासह माहिती देण्यात आली व शेतकºयांच्या अनेक शंकांचे निरसन करण्यात आले. सोबतच प्रशिक्षण कार्यक्रमांतर्गत कामगंध सापळ्यांचे वितरण करण्यात आले. याप्रसंगी चामोर्शी तालुक्यातील अनेक गावातील शेतकरी हजर होते.कीड व रोग व्यवस्थापनाविषयी मार्गदर्शनडॉ. एस. एम. वासनीक यांनी कापूस लागवडीचे तंत्रज्ञान समजावून सांगत कापूस पीक नगदी पीक असल्यामुळे या पिकापासून अधिक उत्पादन घेऊन शेतकºयांनी आर्थिक स्तर उंचवावा. कापसाची योग्य लागवड व व्यवस्थापन करून अधिक उत्पादन घेता येते. किडीपासून पिकाचे संरक्षण करण्यासाठी कामगंध सापळ्यांचा वापर करण्याविषयी मार्गदर्शन केले. डॉ. दीपक नगराळे यांनी कापूस पिकावर येणारी कीड, रोग तसेच लक्षणे, कारणे व काळजी याबाबत मार्गदर्शन केले.
बोंडअळी व्यवस्थापनाचे धडे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 22, 2018 1:06 AM
जिल्ह्यात कापूस पिकाखालील लागवडीचे क्षेत्र दरवर्षी वाढत आहे. शेतकरी अधिकाधिक उत्पादन घेण्याचा प्रयत्न करीत असतानाच कपाशीवर गुलाबी बोंडअळी व अन्य रोगांचा प्रादुर्भाव होत असल्याने शेतकऱ्यांना तोटा सहन करावा लागतो.
ठळक मुद्देचामोर्शीत शेतकरी प्रशिक्षण : घारगाव, मार्कंडा, भेंडाळा येथील पिकाची पाहणी