सभेच्या अध्यक्षस्थानी मुख्याध्यापक संघाचे अध्यक्ष मनीष शेटे हाेते. सभेदरम्यान विविध विषयांवर चर्चा करून प्रशासनस्तरावर पाठपुरावा करण्याचे ठरले. त्यानंतर शिक्षणाधिकारी राजकुमार निकम यांच्याशी चर्चा झाली. सभेला वेतन व भविष्य निर्वाह निधी पथक कार्यालयातील अधीक्षक दिलीप मेश्राम, शिक्षण विभागाचे विस्तार अधिकारी अमरसिंग गेडाम, मुख्याध्यापक संघाचे अध्यक्ष मनीष शेटे, सचिव श्रीपाद वठे, सल्लागार संजय नार्लावर, टी. के. बोरकर, उपाध्यक्ष संजय भांडारकर, बाळकृष्ण सावसाकडे, कोषाध्यक्ष मुकुंद म्हशाखेत्री, सहसचिव मुरलीधर नागोसे, विनय चव्हाण, सदस्य विजय झोळे, सागर म्हशाखेत्री, देवेंद्र नाकाडे, गिरीधर उंदीरवाडे उपस्थित होते.
बाॅक्स
शिक्षणाधिकाऱ्यांशी या विषयांवर चर्चा
कार्यकारिणी सभेनंतर शिक्षणाधिकारी (माध्यमिक) राजकुमार निकम यांच्या अध्यक्षतेखाली वेतनेत्तर अनुदान, संच मान्यता, आधार सक्ती व जिल्हास्तरावर दुरुस्ती, वैद्यकीय बिले, प्लॅनच्या शाळांची नॉन प्लॅनबाबत, भविष्य निर्वाह निधी, अनुदान पात्र शाळांच्या विविध समस्या साेडविणे, मुख्याध्यापकांचे सेवानिवृत्ती प्रकरणे निकाली काढणे, मुख्याध्यापकांचे वेतन न थांबविणे, सातव्या वेतन आयोगानुसार रजा रोखीकरण, सातव्या वेतन आयोगातील जी. पी. एफ.मध्ये जमा हाेणारी देयके, मानव विकास मिशन योजना, डी. सी. पी. एस. तापसणी, समायोजन, मुख्याध्यापकांची संच मान्यतेतील पदे, आदी विषयांवर चर्चा झाली.