सर्च संस्थेचा पुढाकार : अभय बंग यांच्या नेतृत्वात दोन दिवस झाली कार्यशाळागडचिरोली : गडचिरोली हा संपूर्ण दारूबंदी असलेला जिल्हा आहे. तो जिल्हा आता तंबाखूमुक्त करण्यासाठी प्रत्यक्ष कृती योजना कार्यान्वित करण्याची गरज असून यासाठी निश्चित धोरण व उपाययोजना झाली पाहिजे, याविषयावर ज्येष्ठ समाजसेवक डॉ. अभय बंग यांच्या उपस्थितीत दोन दिवसीय कार्यशाळेत मंथन करण्यात आले.या कार्यशाळेला विविध क्षेत्रातील मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते. राज्यात तंबाखू सेवन विविध प्रकारे होताना आपणास दिसते. यात बिडी, सिगारेट आणि हुक्का यासारख्या माध्यमातून धुराद्वारे अर्थात धुम्रपानातून तंबाखू सेवन होते. काही जण वेगळ्या पद्धतीने आधीन झालेले आहेत. शिंके, फुंके आणि थुके असे तीन प्रकार यात येतात. तंबाखूची पुड करून नाकावाटे नस म्हणूून त्याचे व्यसन करणारे शिंकतात, बिडी, सिगारेटवाले फुंकतात आणि सुपारी आणि पान यांच्या समावेत त्याचे सेवन करणारे थुंकतात, अशी वर्गवारी या कार्यशाळेच्या निमित्ताने डॉ. बंग यांच्या उपस्थितीत करण्यात आली. सर्च ने केलेल्या सर्वेक्षणात २००८-०९ मध्ये जिल्ह्यात तंबाखूवर ७३ कोटींचा खर्च तर २०१४ मध्ये तंबाखूवर २६० कोटींचा खर्च होत असल्याचे आढळून आले.२०१४ मध्ये ६० टक्के लोक तंबाखूचे सेवन करीत असल्याचे दिसून आल्याची माहिती सर्चचे जनसंपर्क अधिकारी संतोष सावळकर यांनी या चर्चासत्रात उपस्थित मान्यवरांना दिली. (शहर प्रतिनिधी)
तंबाखू मुक्तीसाठी धोरण निश्चितीवर मंथन
By admin | Published: October 31, 2015 2:14 AM