शहरं
Join us  
Trending Stories
1
कट्टर नेत्यांच्या बंडामुळे चिंता; दाेन दिवस मनधरणीचा फराळ, वर्षानुवर्षे संघ अन् भाजपत सक्रिय असलेल्यांचेच धक्के
2
महायुतीच्या प्रचाराचा प्रारंभ कोल्हापुरातून, मंगळवारी ‘तपोवन’वर होणार पहिली सभा 
3
लक्ष्मीपूजनाच्या दिवशी सोने-चांदीत घसरण, खरेदीचा मुहूर्त साधण्यासाठी सुवर्ण पेढ्यांमध्ये उत्साह
4
मंत्र्यांच्या संपत्तीची कोटीच्या कोटी उड्डाणे, मंत्री लोढा वगळता पाच वर्षांत सर्व मंत्र्यांच्या संपत्तीत भरघोस वाढ
5
शायनांबद्दल अपशब्द; खासदार अरविंद सावंतांवर गुन्हा; विधानसभा निवडणुकीत नव्या मुद्द्याला ताेंड
6
सर्वांनी मिळून एकच उमेदवार ठरवावा : मनोज जरांगे पाटील
7
निवडणूक आयोगाचा अब्दुल सत्तार यांना दणका; मालमत्तेची खोटी माहिती दिल्याचे प्रकरण
8
मुहूर्ताला मुंबई शेअर बाजारात तेजीचे फटाके; सोने-चांदीच्या भावात घसरण
9
एमबीबीएसच्या प्रवेशांची माहिती सादर करा, महाविद्यालयांना ८ नोव्हेंबरपर्यंत मुदत
10
महायुती, मविआला अपक्षांचे आव्हान?  मुंबईतील दहा मतदारसंघांत उमेदवारांना टेन्शन
11
शिष्यवृत्तीला उशीर झाल्यास विद्यापीठ, महाविद्यालय जबाबदारउच्च शिक्षण संचालनालयाचे निर्देश; प्रलंबित अर्जांची पडताळणी करा
12
Muhurat Trading : मुहूर्त ट्रेडिंगनंतर तेजीसह बाजार बंद, 'या' १० शेअर्समध्ये जोरदार खरेदी, गुंतवणूकदारांनी कमावले ४ लाख कोटी
13
Mumbai Crime: फटाके फोडण्याच्या वादातून तरुणाची हत्या, मुंबईतील धक्कादायक घटना
14
जरांगेंच्या यादीला ओबीसींची यादी तयार, जो तो उठतोय त्यांनाच भेटायला जातोय; लक्ष्मण हाकेंनी रणशिंग फुंकले
15
किंग कोहलीची 'विराट' चूक; मैदानात थांबण्यापेक्षा चोरटी धाव घेण्याच्या नादात फसला (VIDEO)
16
पोस्टर'वार'! योगी आदित्यनाथ यांच्या 'बटेंगे तो कटेंगे'ला अखिलेश यादवांकडून पलटवार
17
भीषण! पाकिस्तानमध्ये मोठा बॉम्बस्फोट; ५ शाळकरी मुलं आणि एका पोलिसासह ७ जणांचा मृत्यू
18
'लॉरेन्स बिश्नोईने मला लवकर मारावे...', खासदार पप्पू यादव असं का म्हणाले?
19
IND vs NZ, 3rd Test Day 1 Stumps : फलंदाजांमुळे टीम इंडिया अडचणीत; ८६ धावांत गमावल्या ४ विकेट्स
20
"चुकीची चिठ्ठी काढणारा पोपट, आजपर्यंत...!"; शंभूराज देसाई यांचा संजय राऊतांना टोला

हत्तीएवढं क्राैर्य? सोंडेने आपटून मारले, नंतर..., रानटी हत्तींचे मृतदेहावरही वार

By गेापाल लाजुरकर | Published: November 27, 2023 8:20 AM

Gadchiroli: शेतात येणाऱ्या रानटी हत्तींना जंगलात पिटाळून लावण्यासाठी गेलेल्या मरेगाव येथील मनाेज  प्रभाकर येरमे (३८) यांना रानटी हत्तीने शनिवारी रात्री रस्त्यावर आपटून ठार केले व पायाखाली तुडविले.

- गाेपाल लाजूरकर, पुंजीराम मेश्रामगडचिराेली / वडधा - शेतात येणाऱ्या रानटी हत्तींना जंगलात पिटाळून लावण्यासाठी गेलेल्या मरेगाव येथील मनाेज  प्रभाकर येरमे (३८) यांना रानटी हत्तीने शनिवारी रात्री रस्त्यावर आपटून ठार केले व पायाखाली तुडविले.एवढ्यावरच हा क्रूरपणा न थांबता हत्तींनी मध्यरात्री पुन्हा मनाेजच्या मृतदेह तुडवत शरीर छिन्नविच्छिन्न केले. तसेच वनकर्मचाऱ्यांच्या दुचाकी व बॅगही उचलून फेकल्या.

दाेन्ही हात गायबरानटी हत्तींनी मृतदेह छिन्नविच्छिन्न केला. पाय व डाेके घटनास्थळापासून ३० मीटर अंतरावर झुडपात नेऊन टाकले. घटनास्थळी केवळ छातीचा भाग व उजवा पाय हाेता. दुसऱ्या दिवशी दुसरा पाय व डाेक्याचा भाग सापडला; परंतु दाेन्ही हात सापडले नाहीत.

 सायकलवरून उतरणार तेवढ्यातच हल्ला- हत्तींचा कळप जंगलातून शेतीकडे येत असल्याची माहिती मिळताच मनाेज येरमे हे निमेश मडावी व मनेश टेकाम यांच्यासह रात्री घरून निघाले.- गावापासून ३०० मीटर अंतरावरच त्यांना हत्ती शेतात जाताना दिसले. हत्ती आपल्याकडे येत असल्याचे पाहून निमेश व मनाेज हे झाडावर चढले.- मनाेज हे रस्त्यावर सायकल उभी ठेवत असतानाच एका हत्तीने साेंडेत पकडून दाेन वेळा आपटल्याने त्यांचा मृत्यू झाला. - इतर दोघांनी घटनेची माहिती गावात दिली. त्यानंतर ग्रामस्थ घटनास्थळी आले. परंतु हत्तींपुढे कुणाचेच काही चालेना. -दाेन तासांनी हत्ती पुन्हा  घटनास्थळाकडे आले.-तेवढ्यात लाेकांनी गावाकडे पळ काढला. रात्रीच्या ११ वाजेपासून मध्यरात्रीपर्यंत हत्तींनी मनाेज यांचा मृतदेह पायाखाली तुडवून छिन्नविच्छिन्न केला.

टॅग्स :Gadchiroliगडचिरोली