शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL Auction 2025: 'अनुभवी' अश्विनसाठी दोन जुने संघ भिडले, अखेर CSK ने RR ला दिली मात, कितीला विकत घेतलं?
2
'ज्यांनी मला त्रास दिला ते सगळे साफ झाले', अशोक चव्हाणांची थोरात-देशमुखांवर बोचरी टीका
3
IPL Auction 2025: मुंबई इंडियन्सने सोडलेला जोफ्रा आर्चर अखेर राजस्थान रॉयल्समध्ये गेला, किती मिळाली किंमत?
4
शिवसेना मुख्यमंत्री पदावर अडीच वर्षासाठी दावा करणार? केसरकर स्पष्टच बोलले...!
5
IPL Auction 2025 : MI नं दिला नाही भाव; Ishan Kishan साठी काव्या मारन यांनी लावली एवढ्या कोटींची बोली
6
IPL Auction 2025 : बिग सरप्राइज! SRK च्या KKR नं रिलीज केलेल्या खेळाडूसाठी मोजली मोठी किंमत, अनेकांच्या भुवया उंचावणारी बोली
7
'तरुण नेतृत्व उभारणार, घरी बसणार नाही', पराभवानंतर शरद पवार नव्या जोमाने कामाला लागले
8
IPL Auction 2025: Gujarat Titans ची शांतीत क्रांती! ३ मॅचविनर खेळाडूंना 'गपचूप' घेतलं ताफ्यात, पाहा कोण?
9
"योगी आदित्यनाथांच्या 'त्या' घोषणेमुळे...";'बटेंगे तो कटेंगे'वर शरद पवारांचे महत्त्वाचे विधान
10
"...त्यामुळे महिलांनी आमच्या विरोधात मतदान केलं"; निकालानंतर शरद पवारांची पहिली प्रतिक्रिया
11
IPL 2025 Auction : १८ कोटींच पॅकेज नाकरणाऱ्या KL Rahul साठी DC नं किती कोटी मोजले ?
12
"EVM बाबत माहिती नाही, पण लोक सांगतात की..."; पराभवानंतर शरद पवारांचे मोठं विधान
13
महायुतीच्या विजयात CM योगींची किती मोठी भूमिका? चंद्रशेखर बावनकुळे म्हणतात...
14
IPL Auction 2025: युजवेंद्र चहलला १७७ % 'अप्रेझल'! बनला सर्वात महागडा स्पिनर, पंजाब किंग्जने घेतलं संघात
15
"काय झालं हेच आम्हाला कळेना...;" निवडणूक निकालाच्या दुसऱ्या दिवशी काँग्रेसनं सांगितला पुढचा प्लॅन
16
TATA IPL Auction 2025 Live: इशान किशन हैदराबादच्या ताफ्यात; SRH ने लावली 11.25 कोटींची बोली...
17
IPL Auction 2025: व्वा पंत... मानलं ! अवघ्या १५ मिनिटात इतिहास बदलला, रिषभ सर्वात महागडा खेळाडू ठरला!!
18
विधानसभा संपल्या, आता विधान परिषदेवर लक्ष; महायुतीच्या कोणत्या 6 नेत्यांना लागणार लॉटरी?
19
बनावट ASP बनून फिरली, पोलिसांनी केलं सॅल्यूट; एक छोटीशी चूक होताच झाली पोलखोल
20
"नियोजनाप्रमाणे प्रचार केला नाही"; काँग्रेस नेत्याने शरद पवार-ठाकरेंवर फोडलं पराभवाचे खापर

कराराचा भंग, सूरजागडमध्ये अवैध लोहखनीज उत्खनन; केंद्र सरकारला हायकोर्टाची नोटीस

By संजय तिपाले | Published: May 05, 2023 1:02 PM

कराराचा भंग केल्याचा कंत्राटदार कंपनीवर आरोप: स्पष्टीकरणासाठी महिनाभराची मुदत

गडचिरोली : विविध कारणांनी सतत चर्चेत असलेल्या सूरजागड लोहखणीज प्रकल्पात कंत्राटदार कंपनीने करारभंग केल्याचा आरोप करुन अवैध उत्खनन केले आहे. याची चौकशी करुन कारवाई करावी, या मागणीसाठी चंद्रपूर येथील प्रकृती फाऊंडेशनने उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात याचिका दाखल केलेली आहे. त्यावर झालेल्या सुनावणीनंतर खंडपीठाने केंद्र सरकारच्या अखत्यारित असलेल्या वने व पर्यावरण मंत्रालयाला नोटीस बजावली आहे. नोटीसचे उत्तर देण्यासाठी महिनाभराची मुदत दिली आहे. 

सूरजागड येथील लोहखनीज उत्खननाचे कंत्राट लॉयड मेटल्स ँड एनर्जी लिमिटेडने मिळवले. कंत्राट देताना कंपनीला शासनाने विविध नियम व अटी घालून दिलेल्या आहेत. मात्र, त्याचा भंग केल्याचा आरोप करुन प्रकृती फाऊंडेशनने नागपूर खंडपीठात जनहित याचिका दाखल केली. या याचिकेच्या सुनावणीदरम्यान न्यायालयाने केंद्र शासन, गडचिरोली जिल्हाधिकारी यांच्यासह अकरा प्रतिवाद्यांना नोटीस बजावून उत्तर दाखल करण्याचे आदेश दिले. खाण परिसरात किंवा जिल्ह्यातच कारखाना उभारून प्रक्रिया करावी, अशी अट होती. दरम्यान, या करारात बदल करून राज्य शासनाने प्रक्रियेनंतर शिल्लक खनिज विदर्भात विक्री करता येईल अशी परवानगी दिली होती. मात्र, कंपनीने अद्याप ना प्रक्रियेसाठी कारखाना सुरु केला ना कराराचे पालन केले. खाण सुरू झाल्यापासून ५७ लाख टन खनिज परराज्यात विकण्यात आले. दुसरीकडे याभागात जैवविविधता आणि जंगल वाचवण्यासाठी कोणतेही उपाय केलेले नाही, असा आरोप याचिकेद्वारे केला आहे.....पेसा कायद्याचे उल्लंघन, आदिवासींमध्ये रोषएटापल्ली तालुक्याचा अनुसूचित क्षेत्र (पेसा) अंतर्गत समाावेश आहे. तेथे कुठल्याही प्रकल्पासाठी ग्रामसभांची परवानगी आवश्यक आहे.मात्र, सूरजागड प्रकल्पाच्या निर्मितीवेळी ग्रामसभांना डावलण्यात आले.  ग्रामसभांचा विरोध डावलून प्रकल्पा उभारल्याने आधीच आदिवासींमध्ये रोष आहे. २००७ मध्ये कंत्राट मिळूनही प्रत्यक्षात लोहखनीज उपसा करण्यास २०२१ उजाडावे लागले. दरम्यान, या प्रकल्पामुळे आदिवासींना रोजगाराच्या संधी दिल्याचा दावा केला जात असला तरी वस्तूस्थिती वेगळी असल्याचा आरोप आहे. याचिकाकर्त्यांकडून ॲड. महेश धात्रक यांनी बाजू मांडली.

टॅग्स :GadchiroliगडचिरोलीHigh Courtउच्च न्यायालयCentral Governmentकेंद्र सरकार