काेणत्याही व्यक्तीने लाच मागणे हा गुन्हा आहे. लाचेच्या प्रकरणांना आळा घालण्यासाठी शासनाने स्वतंत्र लाचलुचपत विभागाची स्थापना केली आहे. जिल्हास्तरावर या विभागाचे कार्यालय आहे. काेराेनाच्या महामारीत अनेकांचा राेजगार हिरावला गेला आहे. शेतकऱ्यांना त्यांचे उत्पादन विक्रीस मर्यादा येत आहेत. एकूणच संपूर्ण अर्थचक्र प्रभावित झाले आहे. या सर्व अडथळ्यांमधून नागरिक स्वत:ला सावरण्याचा प्रयत्न करीत आहेत. त्यामुळे लाचेसाठी त्रास देण्याचे प्रमाण कमी हाेईल, अशी अपेक्षा हाेती. मात्र, ते झाले नाही. मागील १५ महिन्यांच्या कालावधीत म्हणजेच फेब्रुवारी २०२० ते मे २०२१ या कालावधीत सुमारे १४ सापळे रचण्यात आले. त्यात २० आराेपींना अटक करण्यात आली आहे. यावरून काेराेनाच्या या गंभीर वातावरणातही लाचखाेरीचे प्रमाण कमी झाले नसल्याचे दिसून येत आहे.
बाॅक्स
कनिष्ठ कर्मचारी स्वीकारतात साहेबासाठी लाच
लाच स्वीकारली तरी आपण प्रत्यक्ष रंगेहात पकडले जाऊ नये, यासाठी बहुतांश अधिकारी आपल्या अधीनस्त कर्मचाऱ्याला लाच स्वीकारायला लावतात. सापळा रचला गेला नाही तर काही टक्के कमिशन कनिष्ठ कर्मचाऱ्याला देऊन उर्वरित रकमेवर अधिकारी डल्ला मारतात. सापळा रचला गेल्यास सर्वात प्रथम कनिष्ठ कर्मचारी सापडतो. ताे साहेबाचे नाव सांगतो. यावेळी त्याच्या बयानावरून साहेबालाही अटक केली जाते. पाच सापळ्यांमध्ये कनिष्ठ कर्मचारी व अधिकाऱ्याला अटक करण्यात आली आहे.
बाॅक्स
जागृतीची गरज
ग्रामीण भागातील नागरिकांकडून माेठ्या प्रमाणात लाच स्वीकारली जाते. मात्र, हे नागरिक सहजासहजी तक्रार करीत नाहीत. त्यामुळे लाचखाेरांचे फावत चालले आहे. तक्रारींचे प्रमाण वाढण्यासाठी नागरिकांमध्ये जागृती करण्याची गरज आहे.
बाॅक्स
काेणत्या वर्षात किती आराेपींना अटक
२०१८-२०
२०१९-२०
२०२१-३
काेराेनाकाळात वन विभागाची जाेरात कमाई
वन विभाग-६
पाेलीस-५
आराेग्य-२
महसूल-२
अभियंते-२
ग्रामसेवक-१
शिक्षण विभाग-१
खासगी इसम-१