लोकमत न्यूज नेटवर्कदेसाईगंज : देसाईगंज शहरासह तालुक्यात अवैैध दारूविक्री केली जात आहे. दारूमुळे अनेक कुटुंब उद्ध्वस्त झाले आहेत. त्यामुळे अवैैध दारूविक्रेत्यांना तडीपार करावे, अशी मागणी महिला व पुरुष दारूबंदी समिती शिवाजी वॉर्ड तसेच कस्तुरबा वॉर्र्डातील महिलांनी शुक्रवारी शिवाजी वॉर्डात आयोजित सभेत केली.या सभेला पोलीस निरीक्षक सिद्धानंद मांडवकर, पोलीस उपनिरीक्षक स्वाती फुलेकर, भारती उपाध्याय, आशा राऊत, शर्मा उपस्थित होते.याप्रसंगी दारूबंदी संघटनेच्या वतीने पोलीस निरीक्षकांमार्फत उपविभागीय अधिकाऱ्यांना निवेदन देताना अवैैध दारूविक्रेत्यांना तडीपार करण्याची मागणी केली.कार्यक्रमाचे संचालन शहजाद खान पठाण तर आभार नानू कुमरे यांनी मानले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी शोभा ठाकरे, उज्जू मेश्राम, तेजस्विनी साळवे, राकेश नागापुरे, नारायण सहारे, सरस्वती मडकाम, शोभा ठाकरे, देवेंद्र मोरे, साबू पठाण, मनीष सुखदेवे, राजू साळवे, गोपाल कुंभरे, विवेक अलोणे, जगन्नाथ सरकार, भुवनेश्वरी अलोणे यांनी सहकार्य केले.भ्रमणध्वनीवर माहिती द्याकस्तुरबा वॉर्ड आणि शिवाजी वॉर्डातील अवैैध दारूविक्रीवर आळा घालण्यासाठी महिला व पुरुष दारूबंदी समिती आणि पोलीस स्टेशन नेहमी प्रयत्न करीत आहे. परंतु काही ठिकाणी छुप्या पद्धतीने अवैैध दारूविक्री केली जात आहे. शहरात कुठेही अवैैध दारूविक्री होत असल्याचे आढळून आल्यास याची माहिती पोलिसांना द्यावी. अथवा मला थेट भ्रमणध्वनीवर याची सविस्तर माहिती द्यावी, असे आवाहन पोलीस निरीक्षक मांडवकर यांनी केले.
दारूविक्रेत्यांना तडीपार करा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 05, 2018 1:19 AM
देसाईगंज शहरासह तालुक्यात अवैैध दारूविक्री केली जात आहे. दारूमुळे अनेक कुटुंब उद्ध्वस्त झाले आहेत. त्यामुळे अवैैध दारूविक्रेत्यांना तडीपार करावे, अशी मागणी महिला व पुरुष दारूबंदी समिती शिवाजी वॉर्ड तसेच कस्तुरबा वॉर्र्डातील महिलांनी शुक्रवारी शिवाजी वॉर्डात आयोजित सभेत केली.
ठळक मुद्देमहिलांची पोलिसांकडे मागणी : देसाईगंज येथे दारूबंदी समितीची सभा