लाेकमत न्यूज नेटवर्क सिराेंचा : इंग्रजांनी कैद्यांना ठेवण्यासाठी बंदीगृहाची इमारत बांधली हाेती. देशातून इंग्रज गेले असले तरी इमारत कायम आहे. ही इमारत इंग्रज राजवटीची आठवण करून देते. त्यामुळे ऐतिहासिक वास्तूमध्ये या इमारतीचा समावेश करण्याची गरज आहे. मात्र, त्याकडे शासनाचे दुर्लक्ष झाले आहे.
स्वातंत्र्याच्या अगाेदर निजामशाहीनंतर ब्रिटिश राजवटीत सिराेंचा शहराला महत्त्वपूर्ण स्थान हाेते. इंग्रज धर्मप्रचारकांनी सुटीच्या कालावधीत सामाजिक कार्य करण्यास प्रारंभ केला हाेता. सिराेंचात ब्रिटिश कलेक्टरसुद्धा राहत हाेते. सध्याच्या तहसील कार्यालयात सैन्य शिबिर हाेते. तहसील कार्यालयाची इमारत, तहसीलदारांचे निवासस्थान, जुने नायब तहसीलदारांचे निवासस्थान हे त्याकाळी सैनिक व अधिकाऱ्यांचे निवासस्थान हाेते समाेर घाेडे बांधली जात हाेती. सध्याचे तहसील कार्यालयाच्या एका कडेला तीन खाेलीचे बंदीगृह आहे. या बंदीगृहात आराेपींना ठेवले जात हाेते. स्वातंत्र्यानंतरसुद्धा आराेपींना या ठिकाणी ठेवले जात हाेते. प्रत्येक खाेलीत शाैचालयाची व्यवस्था आहे. कैद्यांना झाेपण्यासाठी चुनखडी व दगडाने बनविलेला ओटा आहे. इमारत अतिशय मजबूत आहे. मात्र वापराअभावी रिकामी आहे.
बाॅक्स....
स्वातंत्र्यानंतरही वापर
स्वातंत्र्यानंतरही १९८८ पर्यंत आराेपींना कैदखान्यात ठेवण्यासाठी या बंदीगृहाचा उपयाेग हाेत हाेता. समाेर सुरक्षारक्षक राहत हाेते. त्यांचे आरामगृह आताही आहेत. ब्रिटिशकालीन वास्तुकलेने बांधलेली इमारत अजूनही मजबूत आहे. या इमारतीकडे पाहताना नागरिकांना ब्रिटिशकालीन शासनाची आठवण हाेते. त्यामुळे अनेक नागरिक कुतुहलाने या इमारतीकडे बघतात. सध्या ही इमारत बंदावस्थेत आहे. केवळ एका खाेलीत संजय गांधी निराधार याेजनेचे कार्यालय आहे.