चामोर्शी शहरासह तालुक्याची लोकसंख्या दोन लाखाच्या घरात असून शहरात २०० च्या वर ब्राॅडब्रॅण्ड सेवेचे ग्राहक आहेत तर मोबाईल धारकांची संख्या प्रचंड आहे. शहरासह तालुक्यात बीएसएनएलसह इतर कंपन्यांनी आपले टाॅवर उभे करून इतर कंपन्याचे टाॅवर चांगले सेवा देत आहेत तर बीएसएनएलच्या नेटवर्कमुळे ही सेवा कुचकामी ठरत आहे. याबाबत ग्राहकांच्या नेहमीच तक्रार होतात परंतु याकडे दुर्लक्ष केले जाते. ग्रामीण भागात बीएसएनएल सेवेशिवाय पर्याय नसल्याने त्यांची मोठी अडचण होत आहे. चामोर्शी शहरात अनेक बँका, शाळा, महाविद्यालये, विविध कार्यालये, व्यावसायिक, आधार केंद्र, आपले सरकार केंद्र इत्यादी ग्राहकाकडे ब्राॅडबॅण्ड सेवा आहेत. त्यांना नेहमी नेटवर्क व स्पीडअभावी या सर्वांची कामे विस्कळीत होत आहेत. गेल्या एक वर्षापासून कोरोनामुळे शाळा बंद असून विद्यार्थ्यांना व कंपनीच्या अनेक अधिकारी, कर्मचाऱ्यांना "वर्क फ्रॉम होम" करावे लागत आहे मात्र नेटवर्क राहत नसल्याने त्यांना काम करणे फार कठीण होत आहे.
बाॅक्स
तीन दिवसांपासून नेटवर्क व स्पीड गायब
तीन दिवसांपूर्वी तीन दिवस मोबाईल नेटवर्क, ब्राॅडबॅण्ड सेवेचे नेटवर्क व स्पीड गायब झाली तर कव्हरेजही नसल्याने ग्राहक त्रस्त झाले असून दाद कुणाकडे मागावी ही मोठी समस्या निर्माण झाली आहे. चामोर्शी शहरातील हनुमान नगर येथील विजय कोमेरवार यांनी गेल्या २५ ते २७ तारखेला कव्हरेज नसल्याने त्यांना त्रास झाला त्यामुळे त्यांनी अखेर बीएसएनएलच्या केअर सेंटरला तक्रार नोदवली असून सेवा सुरळीत करण्याचीही मागणी त्यांनी केली आहे.