सिरोंचा येथील शासकीय कार्यालये व बँकांमध्ये ब्रॉडबँडसेवा उपलब्ध आहे. परंतु बीएसएनएल सेवा योग्यप्रकारे मिळत नसल्याने कामे प्रभावी होत आहे. तालुक्यातील ग्रामीण भागात बीएसएनएलचे जाळे पसरले आहे. त्यामुळे या सेवेवरच ग्राहकांना अवलंबून राहावे लागत आहे. परंतु कव्हरेज वारंवार विस्कळीत होत असल्याने अनेक कामे प्रभावित होतात. ब्रॉडबँड सेवा विस्कळीत झाल्यानंतर ग्राहकांना बँकेसमोर तसेच शासकीय कार्यालयांमध्ये उभे राहावे लागते. इंटरनेटसेवा सुरळीत न झाल्यास दुपारनंतर त्यांना आल्यापावली परतावे लागते.
बीएसएनएलची थ्री-जी सेवा मागील एक वर्षापासून ग्राहकांना मिळत आहे. त्यातही खासगी कंपन्या ४-जी सेवा देत असताना बीएसएनएल ग्राहकांना ३-जी वरच समाधान मानावे लागत आहे. बीएसएनएल थ्री-जी सेवा नावापुरतीच असून टू-जी ची स्पीडसुद्धा पकडत नाही.
बाॅक्स
मंद इंटरनेटमुळे कामे प्रभावित
शासकीय ऑनलाइन कामे प्रभावित
सिरोंचा तालुक्यात बीएसएनएलचे १० हजारांवर ग्राहक आहेत. रिचार्जच्या माध्यमातून कंपनीला बऱ्याप्रमाणात आर्थिक उत्पन्न मिळते. महिन्याला लाखो रूपयांचे उत्पन्न देणाऱ्या ग्राहकांना योग्य प्रकारे सेवा मिळत नाही. तालुक्यात भ्रमणध्वनी सेवा विस्कळीत होणे ही नित्याचीच बाब झाली आहे. याचा परिणाम कार्यालयीन कामे तसेच ऑनलाइन कामांवर होतो. शालेय विद्यार्थ्यांना विविध कामांकरिता प्रमाणपत्र ऑनलाइन काढावी लागतात. याशिवाय शासकीय कर्मचारीसुद्धा ऑनलाइन कामे करतात. परंतु त्यांना ३-जी सेवा योग्प्रकारे मिळत नसल्याने काम रखडते.