आॅनलाईन लोकमतगडचिरोली : एटापल्ली तालुक्यातील जाराबंडी ते कसनसूर दरम्यान १२ किलोमीटरवर असलेल्या रोपी गावात नक्षलवाद्यांनी बीएसएनएलच्या टॉवरला आग लावल्याने टॉवरची यंत्रणा जळून खाक झाली. यानंतर नक्षलवाद्यांनी त्या भागात आपले बॅनर लावून मंगळवार, १२ डिसेंबरला भारत बंद पाळण्याचे आवाहन केले.ही घटना रविवारी रात्री १० वाजताच्या सुमारास घडली. परंतु याची माहिती सकाळपर्यंत पोलीस किंवा बीएसएनएलला मिळाली नव्हती. टॉवरचे सिग्नल मिळत नसल्यामुळे बीएसएनएलच्या गडचिरोली कार्यालयाने सोमवारी सकाळी आपल्या अभियंत्याला पाहणीसाठी पाठविले.दरम्यान पोलिसांनीही बीएसएनएलच्या अधिकाऱ्यांना या घटनेची माहिती दिली. नक्षल्यांनी तिथे लावलेले बॅनर दुपारपर्यंत कायम होते. त्यानंतर पोलिसांनी तिथे जाऊन नक्षली बॅनर काढले.
गडचिरोलीत नक्षल्यांनी जाळले बीएसएनएलचे टॉवर; यंत्रणा निकामी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 12, 2017 10:19 AM
आॅनलाईन लोकमतगडचिरोली : एटापल्ली तालुक्यातील जाराबंडी ते कसनसूर दरम्यान १२ किलोमीटरवर असलेल्या रोपी गावात नक्षलवाद्यांनी बीएसएनएलच्या टॉवरला आग लावल्याने टॉवरची यंत्रणा जळून खाक झाली. यानंतर नक्षलवाद्यांनी त्या भागात आपले बॅनर लावून मंगळवार, १२ डिसेंबरला भारत बंद पाळण्याचे आवाहन केले.ही घटना रविवारी रात्री १० वाजताच्या सुमारास घडली. परंतु याची माहिती सकाळपर्यंत ...
ठळक मुद्देभारत बंद पाळण्याचे आवाहन