चामोर्शी शहरासह तालुक्याची लोकसंख्या दोन लाखांच्या घरात आहे. एकट्या चामोर्शीतच २०० च्या वर ब्रॉडबँड सेवेचे ग्राहक आहेत. मोबाईलधारकांची संख्या तर प्रचंड आहे. तालुक्यात बीएसएनएलसह इतर कंपन्यांनी आपले टॉवर उभे केले असून ते चांगली सेवाही देत आहेत. तरीही बीएसएनएलच्या सेवेत सुधारणा होताना दिसत नाही. ग्राहकाच्या नेहमीच तक्रार असूनही त्याकडे दुर्लक्ष केले जाते. ग्रामीण भागात बीएसएनएलशिवाय पर्याय नसल्याने त्यांची मोठी अडचण होत आहे.
(बॉक्स)
बीएसएनएलवर नियंत्रण कोणाचे?
चामोर्शीत अनेक बँका, शाळा, महाविद्यालये, विविध कार्यालये, व्यवसायिक, आपले सरकार केंद्र, आदी ठिकाणी सरकारी कंपनी असलेल्या बीएसएनएलची सेवा घेतली जाते. पण नेटवर्क आणि स्पीडअभावी या सर्वांची कामे विस्कळीत होत आहेत. त्याचा फटका सामान्य नागरिकांपासून सर्वांनाच बसत आहे. विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होत आहे. अतिशय निकृष्ट सेवा देणाऱ्या या सरकारी कंपनीच्या कारभारावर कोणाचेच नियंत्रण नसल्याचे दिसून येत आहे.