ऑनलाईन लोकमतगडचिरोली : अर्थसंकल्पात कृषी,सिंचन, पायाभूत सुविधा यांच्यावर विशेष तरतूद करण्यात आली आहे. त्यामुळे सदर अर्थसंकल्प गडचिरोली जिल्ह्यासाठी विशेष लाभदायक असल्याची माहिती खासदार अशोक नेते यांनी पत्रकार परिषदेत दिली.अर्थसंकल्पात शेतकऱ्यांचे उत्पन्न दुप्पट करण्याच्या उद्देशाने विशेष तरतुदी करण्यात आल्या आहेत. यामध्ये कृषीपंपांना विद्युत जोडणी देण्यासाठी ७५० कोटी रूपयांची तरतूद केली आहे. कृषी व अन्न प्रक्रिया योजनेसाठी ५० कोटी, वनशेतीला प्रोत्साहन देण्यासाठी १५ कोटी, फलोत्पादन योजनेचा विस्तार करण्यासाठी आर्थिक तरतूद केली आहे. राज्य परिवहन महामंडळामार्फत शेतमालाची वाहतूक करता येणार असल्याने शेतकऱ्यांसाठी सोयीचे झाले आहे. दारिद्र्य रेषेखालील शेतकऱ्यांना अन्न, धान्याचा लाभ देण्यासाठी ९२२.६८ कोटींची तरतूद केली आहे. जलसिंचन विभागासाठी ८ हजार २३३ कोटींची तरतूद आहे. यामुळे गडचिरोली जिल्ह्यातील अपूर्ण राहिलेल्या बंधाºयांचे काम पूर्ण होण्यास मदत होणार आहे. जलयुक्त शिवार अभियानासाठी १ हजार ५०० कोटी, विहीर, शेततळे यासाठी १६० कोटी रूपयांची तरतूद केली आहे. महाराष्ट्रात नोकऱ्या उपलब्ध व्हाव्या ही बाब लक्षात घेऊन कौशल्य विकास, नवीन उपक्रम आणि उद्योजकता आदी उपक्रम राबविले जाणार आहेत. रस्ते विकासासाठी १० हजार ८२८ कोटींची तरतूद केली आहे. या सर्व बाबींचा गडचिरोली जिल्ह्यालाही लाभ होणार आहे, अशी माहिती खासदार अशोक नेते यांनी दिली. पत्रकार परिषदेला जिल्हा महामंत्री रवींद्र ओल्लालवार, पं.स. उपसभापती विलास दशमुखे, गडचिरोली शहर प्रमुख सुधाकर येनगंधलवार, गजानन येनगंधलवार, अविनाश विश्रोजवार, अनिल पोहणकर, माजी जि. प सदस्य प्रशांत वाघरे, श्रीकृष्ण कावनपुरे, प्रशांत भृगुवार, अनुसूचित जाती आघाडीचे डी. के. मेश्राम आदी उपस्थित होते.
अर्थसंकल्प जिल्ह्यासाठी लाभदायक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 11, 2018 11:21 PM
अर्थसंकल्पात कृषी,सिंचन, पायाभूत सुविधा यांच्यावर विशेष तरतूद करण्यात आली आहे. त्यामुळे सदर अर्थसंकल्प गडचिरोली जिल्ह्यासाठी विशेष लाभदायक .....
ठळक मुद्देखासदारांची माहिती : सिंचनाची सुविधा वाढण्यास होणार मदत