लोकमत न्यूज नेटवर्कअहेरी : स्वातंत्र्याच्या ७२ वर्षानंतरही अहेरी उपविभागातील अनेक गावांमध्ये आजही वीजसेवा पोहोचली नाही. या भागातील आदिवासी व गैरआदिवासी नागरिक मूलभूत सुविधांपासून वंचित आहेत. अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या दुर्लक्षपणामुळे अहेरी उपविभागात विकासाचा अनुशेष शिल्लक आहे. आता अधिकाऱ्यांनी योग्य नियोजन करून अहेरी उपविभागात विद्युत, रस्ते, सिंचनाच्या सुविधा निर्माण करण्यासाठी प्रयत्न करावे, अशा सूचना खा. अशोक नेते यांनी केल्या.स्थानिक तहसील कार्यालयाच्या सभागृहात २७ आॅगस्ट रोजी खा. अशोक नेते यांच्या अध्यक्षतेखाली तालुकास्तरीय आढावा बैठक घेण्यात आली. या बैठकीत ते बोलत होते.याप्रसंगी प्रमुख अतिथी म्हणून भाजपचे प्रदेश कार्यकारिणी सदस्य बाबुराव कोहळे, आदिवासी आघाडीचे जिल्हाध्यक्ष प्रकाश गेडाम, जिल्हा सचिव विनोद आकनपल्लीवार, उपविभागीय अधिकारी दामोधर नान्हे, अहेरीचे तहसीलदार प्रशांत घोरूडे, जिल्हा उपाध्यक्ष रेखा डोळस, ताराबाई कोटांगले, रहिमा सिद्धीकी, गजभिये, तेजस्विनी खोब्रागडे, मालू तोडसाम, कुंदा मेश्राम, पोलीस उपनिरीक्षक कानसे आदी उपस्थित होते.पूरग्रस्त व नुकसानग्रस्त पिकांचे नुकसान झाल्याबाबत तत्काळ सर्वेक्षण करून तसा अहवाल अधिकाºयांनी शासनाकडे सादर करावा, अशा सूचना खा. नेते यांनी यावेळी केल्या. वीज न पोहोचलेल्या गावांची यादी शासनाकडे सादर करून विद्युत पुरवठ्यासाठी प्रस्ताव महावितरणच्या अधिकाºयांनी तयार करावा, असे खा. नेते यांनी सांगितले. अहेरी तालुक्यातील प्रमुख व ग्रामीण रस्त्यांची दुरवस्था झाली आहे. सदर रस्त्यांची त्वरित डागडुजी संबंधित विभागाने करावी, असे निर्देश त्यांनी दिले. साथीचे रोग पसरू नये यासाठी आरोग्य विभागाने फवारणी करावी, असे निर्देश त्यांनी बैठकीत दिले. यावेळी सर्व विभागाचे वरिष्ठ अधिकारी, विभाग प्रमुख हजर होते.
रस्ते, सिंचनसुविधा निर्माण करा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 29, 2018 1:20 AM
स्वातंत्र्याच्या ७२ वर्षानंतरही अहेरी उपविभागातील अनेक गावांमध्ये आजही वीजसेवा पोहोचली नाही. या भागातील आदिवासी व गैरआदिवासी नागरिक मूलभूत सुविधांपासून वंचित आहेत. अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या दुर्लक्षपणामुळे अहेरी उपविभागात विकासाचा अनुशेष शिल्लक आहे.
ठळक मुद्देखासदारांच्या सूचना : अहेरीतील बैठकीत घेतला विविध विकास कामांचा आढावा