कोरची येथील पारबताबाई विद्यालयात विदर्भ माध्यमिक शिक्षक संघाची तालुकास्तरीय सहविचार सभा पार पडली. यावेळी ते बाेलत हाेते. सभेत प्रमुख अतिथी म्हणून बौध्द महासभेचे सचिव श्रावण अंबादे, जिल्हाध्यक्ष दत्तात्रय खरवडे, जिल्हाकार्यवाह अजय लोंढे, जिल्हा संघटक सूरज हेमके, पांडुरंग नागपुरे, मुख्याध्यापक मच्छिरके, सोमणकर, मांडवे आदी उपस्थित होते. विदर्भ माध्यमिक शिक्षक संघटनेने जिल्ह्यातील शिक्षकांच्या संदर्भातील केलेले कार्य, मार्गी लावलेल्या समस्या यांचा लेखाजोखा यावेळी मांडला,तसेच संघटना शिक्षकांसाठी जोमाने काम करेल, असे सभेत ठरविण्यात आले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक जिल्हा कार्यवाह अजय लोंढे, संचालन नामदेव नागपुरे तर आभार गणेश मुंगिलमारे यांनी मानले. सभेच्या यशस्वीतेसाठी महेश चौधरी, हरिश्चंद्र भोवते, श्यामराव उंदीरवाडे,तुळशीराम कराडे, अजय पुलकलवार, सुरेश जमकातन, पराग खरवडे यांनी सहकार्य केले.
संघर्ष करून न्याय मागता येईल अशी ताकद निर्माण करा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 29, 2021 4:34 AM