चिखली येथील विजय डहाळे यांच्या मालकीचा बैल सकाळी चरण्याकरिता गावाशेजारी असलेल्या जंगलात गेला होता. यावेळी रानडुकरांची अवैध शिकार करणाऱ्यांनी याच जंगलात विस्फोटक भरलेले लहान गोळे मांडलेले होते. हा गोळा अनवधानाने बैलाने चघळल्याने तोंडातच याचा विस्फोट होत बैलाचा जबडा फाटला असून जबडा रक्तबंबाळ झाला आहे. येथील पशुवैद्यकीय दवाखान्यात उपचार करण्यात आले. मात्र अन्न ग्रहण करण्याचा जबडा फाटत निकामी झाल्याने बैल जगण्याची शक्यता कमी आहे. वनविभागाकडे याबाबत माहिती देण्यात आलेली आहे. मात्र मानवी चुकीमुळे ही दुर्घटना झाली असल्याने नुकसान भरपाईकरिता नकार दिला. ग्रामीण भागात मोठ्या प्रमाणात जंगली प्राण्यांच्या शिकारीकरिता असे अघोरी प्रयोग अवैध शिकारी करतात. त्यांचा शोध घेत बंदोबस्त करण्यात यावा अशी मागणी नागरिकांकडून हाेत आहे.
विस्फोटक गोळा चघळल्याने बैल गंभीर जखमी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 07, 2021 4:33 AM