संसाररूपी रथाला पती व पत्नीच्या रूपाने समांतरीत दोन चाके असतात. यापैकी स्त्रिया स्वत:च्या कुटुंबाचा उदरनिर्वाह करण्यासाठी अनेक कष्ट घेतात. आदिवासी भागातील महिला उन्हाळभर अनेक प्रकारची कामे करीत असतात. फावल्या वेळात पत्रावळी तयार करणे, चारोळी गोळा करणे, झाडूची कापणी करणे यासारखी कामे महिला करतात. झाडूची कापणी केल्यानंतर जंगलात विo्रांती घेतानाचे हे दृश्य. शासन व प्रशासन जिल्हा विकासाचा कांगावा करीत असले तरी हे दृश्य गडचिरोली जिल्ह्यातील दारिद्रय़ाचे भीषण वास्तव दर्शविते.
संसाराचे ओझे पेलवता पेलवेना ! :
By admin | Published: May 25, 2014 11:31 PM