विशेष म्हणजे गडचिरोली शहरातील हे दुसरे शिबिर आहे. त्यामुळे दि.२ ला झालेल्या पहिल्या शिबिरात रक्तदानाची इच्छा असूनही वंचित राहिलेल्या नागरिकांना रविवारच्या शिबिरात सहभागी होता येणार आहे.
ज्येष्ठ स्वातंत्र्य सेनानी आणि लोकमतचे संस्थापक संपादक जवाहरलालजी दर्डा यांच्या जयंतीपासून गेल्या १० दिवसात जिल्ह्यात ३ रक्तदान शिबिरे झाली आहेत. रविवारी जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या मुख्य शाखेतील सभागृहात सकाळी १० वाजता रक्तदान शिबिराचे उद्घाटन बँकेचे अध्यक्ष प्रंचित पोरेड्डीवार यांच्या हस्ते आणि नाबार्डचे जिल्हा व्यवस्थापक राजेंद्र चौधरी, जिल्हा बँकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी सतीश आयलवार यांच्या प्रमुख उपस्थितीत होणार आहे. या शिबिरात जिल्हा बँकेच्या मुख्य शाखेसह इतर शाखांमधील अधिकारी-कर्मचारी सहभागी होणार आहेत.
या शिबिरात जास्तीत जास्त रक्तदात्यांनी सहभागी होण्याचे आवाहन लोकमतचे कार्यालय प्रमुख डॉ. गणेश जैन, लोकमतचे जिल्हा प्रतिनिधी मनोज ताजने, सखी मंचच्या जिल्हा संयोजिका रश्मी आखाडे तसेच जिल्हा बँकेच्या वतीने करण्यात आले आहे.
(बॉक्स)
बुर्गी पोलिसांच्या पुढाकारातून शिबिर
एटापल्ली तालुक्यातील पोलीस मदत केंद्र बुर्गी यांच्या पुढाकारातून ११ जुलै रविवारला सकाळी १०.३० वाजता रक्तदान शिबिराचे आयोजन केले आहे. हेडरीचे उपविभागीय पोलीस अधिकारी संकेत गोसावी यांच्या मार्गदर्शनाखाली बुर्गीचे ठाणेदार कैलास आलुरे, पोलीस उपनिरीक्षक दशरथ बुरकुल, संदीप व्हसकोठी, एसआरपीएफचे उपनिरीक्षक सुरेश पोटे, सीआरपीएफचे सहायक कमांडर अतुर सिंह, बुर्गी प्राथमिक आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी डॉ. सचिन कन्नाके आदी याप्रसंगी उपस्थित राहणार आहेत. या शिबिराकरिता उपजिल्हा रुग्णालय अहेरीचे वैद्यकीय अधिकारी डाॅ. कन्ना मडावी यांच्या मार्गदर्शनात अहेरी येथील रक्त संकलन चमू येणार आहे. जास्तीत जास्त नागरिकांनी या शिबिरात सहभागी होण्याचे आवाहन ठाणेदार कैलास आलुरे व लोकमतचे प्रतिनिधी रवी रामगुंडेवार यांनी केले आहे.