मनोज ताजने ।लोकमत न्यूज नेटवर्कगडचिरोली : जिल्ह्याच्या दक्षिण-पूर्व भागातील भामरागड तालुक्यात असलेले जंगल म्हणजे मोठी वनसंपत्ती. पण आता अनेक गावालगतचे जंगल झपाट्याने नष्ट होत आहे. कुठे कुºहाडीच्या घावांनी घायाळ झालेली तर कुठे बुंध्यापासून जीवंत पेटवून दिलेली शेकडो झाडे या जंगलातील भयावह परिस्थितीचे दर्शन घडवत आहे. पण अशा परिस्थितीतही संबंधित जंगलाचे रक्षणकर्ते असणारे वन अधिकारी किंवा कर्मचारी झोपेचे सोंग घेऊन त्याकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष करीत असल्याचे संतापजनक चित्र पहायला मिळत आहे.भामरागड वनविभागाअंतर्गत येणाºया ताडगाव वनपरिक्षेत्रातील काही भागात फेरफटका मारला असता वनसंपत्तीचा होत असलेला हा ºहास उघड्या डोळ्यांनी पहायला मिळतो. वनविभागाच्या दुर्लक्षामुळे या जंगलातील शेकडो झाडांची कत्तल झाली आहे. झाडाखालील पालापाचोळ्याला लागलेल्या आगीने आतापर्यंत कितीतरी जंगल आपल्या कवेत घेतले आहे. पण या भागात आग नियंत्रित ठेवण्यासाठी ना फायर लाईन दिसून येते, ना फायर ब्लोअर घेऊन आग विझविणारे वनरक्षक दिसून येतात. एकूणच हे जंगल बेवारस झाल्यासारखी स्थिती पहायला मिळत आहे.ताडगाव ते जिंजगाव या ११ किलोमीटरच्या अंतरात अनेक ठिकाणी झाडे बुंध्यापासून कापलेली आणि काही ठिकाणी झाडांना बुंध्यापासून पेटवून दिल्याचे चित्र पहायला मिळाले. या आडमार्गावर त्या मार्गावरील गावकऱ्यांशिवाय कोणीही फिरकत नाही. रस्ता खराब असल्यामुळे अधिकारी किंवा वन कर्मचारीही जात नसावे. त्यामुळेच जंगलाच्या कायद्यांना न जुमानता सर्रास जंगलाची कत्तल केली जात आहे.जंगल नष्ट करून करायची शेती?गावापासून काही अंतरावरील जंगल दिवसागणिक विरळ होत आहे. अनेक झाडांना बुंध्याजवळ कुºहाडीने घाव घालून ठेवले जाते. नंतर त्याच ठिकाणी ते झाड पोटवून दिले जाते. जंगलात पेटलेल्या वणव्यामुळे झाडाला आग लागली असेल असे प्रथमदर्शन भासते. परंतू जवळ जाऊन पाहिल्यास पेटलेल्या अनेक झाडांच्या सभोवताल वणवा पेटल्याचे लक्षणही दिसत नाही. असे असताना झाड पेटते कसे? हा प्रश्न कायम राहतो. गावालगतचे लोक एकतर सरपण म्हणून वापरण्यासाठी झाडे कापून पुरावा नष्ट करण्यासाठी बुंधा पेटवून देत असावेत.दुसरी शक्यता म्हणजे गावातील शेतकºयांना शेतीसाठी जागा अपुरी पडत आहे. त्यामुळे हळूहळू जंगल नष्ट करून त्या ठिकाणी शेती करण्यासाठी हे सर्व उपद्व्याप सुरू असण्याची शक्यता दबक्या आवाजात ऐकायला मिळत आहे. काहीही असले तरी हा प्रकार गंभीर असून वनविभागाचे अधिकारी-कर्मचारी त्याकडे डोळेझाकपणा करत असल्याने हे त्यापेक्षाही गंभीर मानले जात आहे.अधिकारी निरूत्तरयासंदर्भात ताडगावचे वनपरिक्षेत्र अधिकारी एन.के. तामाणे यांना विचारले असता, राऊंड आॅफिसरची जंगलात चक्कर नेहमी असले असे ते म्हणाले. मग जंगल नष्ट करण्याचा हा प्रकार दिसला नाही का, असे विचारले असता त्याबाबत ते कोणतेही उत्तर देऊ शकले नाही. अधिकाºयांची ही चुप्पी बरेच काही सांगून जाते. केवळ काही मर्यादित भागात फेरफटका मारल्यानंतर हे भयावह चित्र दिसले, अजून आतमधील जंगलात काय स्थिती असेल याची कल्पनाच केलेली बरी.
धगधगत नष्ट होतेय भामरागड तालुक्यातील जंगल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 20, 2019 11:42 PM
जिल्ह्याच्या दक्षिण-पूर्व भागातील भामरागड तालुक्यात असलेले जंगल म्हणजे मोठी वनसंपत्ती. पण आता अनेक गावालगतचे जंगल झपाट्याने नष्ट होत आहे. कुठे कुºहाडीच्या घावांनी घायाळ झालेली तर कुठे बुंध्यापासून जीवंत पेटवून दिलेली शेकडो झाडे या जंगलातील भयावह परिस्थितीचे दर्शन घडवत आहे.
ठळक मुद्देसंडे अँकर । ताडगाव वनपरिक्षेत्र; वनविभागाच्या अधिकाऱ्यांसह कर्मचारीही जंगलातून गायब