लोकमत न्यूज नेटवर्ककमलापूर : प्रचंड तापमानात नागरिकांना वारंवार तहान लागत असते. मात्र प्रवासादरम्यान पाण्याची व्यवस्था न झाल्यास तहानने व्याकुळ व्हावे लागते. प्रवाशांना पाण्यासाठी त्रास होऊ नये, या उद्देशाने राज्य परिवहन महामंडळात कार्यरत बस वाहक भगवान नामदेव जावळे यांच्यातर्फे बसगाडीमध्ये पिण्याच्या पाण्यासाठी कॅनची व्यवस्था केली जात आहे. एका दिवशी दोन कॅन पाणी बसगाडीतील प्रवाशांसाठी उपलब्ध करून दिली जात आहे.एमएच ४० ए क्यू ६०७१ या क्रमांकाच्या बसगाडीमध्ये वाहक भगवान जावळे यांच्यामार्फत प्रवाशांसाठी पाण्याची कॅन ठेवण्यात येत असते. सदर बसवाहक ज्या गाडीमध्ये कर्तव्य बजाविण्यासाठी जात असते त्या बसगाडीत पाण्याच्या दोन कॅन सोबत नेत असते. त्यांच्या या उपक्रमाचे सर्वत्र कौतुक केले जात आहे. महामंडळाच्या अनेक बसेस ग्रामीण व दुर्गम भागात जातात. या बसगाड्यांमधून गरीब प्रवाशी प्रवास करतात. पाणी विकत घेणे त्यांना परवडत नसल्यामुळे वाहकाच्या वतीने प्रवाशांसाठी पाण्याची अशी व्यवस्था करण्यात आली आहे. प्रवाशांना बसमध्येच पाणी मिळत आहे.
बसगाडीत पाण्याची सुविधा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 11, 2019 10:40 PM
प्रचंड तापमानात नागरिकांना वारंवार तहान लागत असते. मात्र प्रवासादरम्यान पाण्याची व्यवस्था न झाल्यास तहानने व्याकुळ व्हावे लागते. प्रवाशांना पाण्यासाठी त्रास होऊ नये, या उद्देशाने राज्य परिवहन महामंडळात कार्यरत बस वाहक भगवान नामदेव जावळे यांच्यातर्फे बसगाडीमध्ये पिण्याच्या पाण्यासाठी कॅनची व्यवस्था केली जात आहे.
ठळक मुद्देप्रवाशांना दिलासा : महामंडळाच्या बस वाहकाचा उपक्रम