देसाईगंज शहर व्यापारी नगरी म्हणून ओळखली जाते. परिसरातील तसेच तालुक्याला तिन्ही जिल्हा सीमा व छत्तीसगढकडे जाणारा राज्य महामार्ग असल्याने येथून वाहनांची नेहमीच वर्दळ असते. शहराच्या मध्यवर्ती भागातून राज्य महामार्ग गेला आहे. तसेच दोन्ही बाजूंना व्यावसायिक दुकाने आहेत. त्यामुळे रस्त्याच्या दुतर्फा वाहनांची गर्दी असते. त्यातच ट्रान्सपाेर्ट व्यवसाय रस्त्यावरच चालत असल्याने वाहतुकीस अडचण निर्माण होते. यामुळे येथे यापूर्वी अनेक अपघात घडले आहेत. हुतात्मा स्मारक ते सार्वजनिक बांधकाम विभाग विश्रामगृह यादरम्यान मुख्य महामार्गावर दुसऱ्या ठिकाणावरून बुक केलेला माल ट्रान्सपाेर्ट व्यवसायाच्या माध्यमातून शहरात येत असते. दर आठवड्यात मालाने भरलेल्या गाड्या ट्रान्सपाेर्ट व्यावसायिक शहरांच्या मुख्य महामार्गावरच उतरवितात. सदर माल उतरविल्यानंतर रस्त्यावरच ठेवला जातो. तसेच संबंधित माल ज्यांचा असेल तिथपर्यंत पोहाेचविण्यासाठी हातगाड्या, टेम्पो व अन्य मालवाहू वाहने त्या भागात उभी राहतात. त्यामुळे तेथे वाहतुकीसाठी धोकादायक परिस्थिती निर्माण होते. शहरात अनेक ट्रान्सपाेर्ट व्यावसायिक आहेत; परंतु त्यांना माल उतरविणे व वाटप करण्यासाठी स्वतंत्र जागा उपलब्ध नाही. शहरात वाहतुकीची कृत्रिम काेंडी निर्माण करणाऱ्यांवर कारवाई करावी, अशी मागणी सिटिझन फाेरमने केली आहे.
बाॅक्स
स्वतंत्र डेपाे निर्मितीची गरज
देसाईगंज शहरातील सर्वच शाळा, काॅलेज, कार्यालये, दवाखाने मुख्य मार्गावर याच मार्गावर आहेत. त्यामुळे शाळा-काॅलेजची मुले याच मार्गावरून ये-जा करीत असतात. तसेच बायपासने जाणारी अवजड वाहनांची रहदारी याच मार्गाने असते. यापूर्वी विश्रामगृहाजवळ दोन दुचाकीस्वारांची समाेरासमाेर धडक होऊन दाेघांचा मृत्यू झाला हाेता. आता याच मार्गावर ट्रान्सपाेर्टचा व्यवसाय करून वाहतुकीची कृत्रिम काेंडी निर्माण करण्याचा प्रयत्न केला जात आहे, तसेच रस्त्याच्या कडेला वाहने ठेवली जात आहेत. या सर्व परिस्थितीमुळे वाहतुकीची समस्या निर्माण हाेते. ही समस्या साेडविण्यासाठी शहरात ट्रान्सपाेर्टसाठी स्वतंत्र डेपाे निर्माण करणे आवश्यक आहे. तेव्हाच ही समस्या काही प्रमाणात सुटू शकते.
030921\img_20210720_123126.jpg
थोरात चौकात अशा प्रकारची ट्रान्सपोर्ट व्यवसाय करणारे वाहने राज्यमहामार्गावरच लावतात.