चामोर्शीतील मुख्य राष्ट्रीय महामार्गापासून हनुमाननगरकडे जाणाऱ्या बायपास रस्ता राईस मिलपासून ते उपविभागीय अधिकारी कार्यालय, घोट काॅर्नरपर्यंत रस्त्यावर अनेक ठिकाणी डांबर उखडून त्यातील गिट्टी मुरूम निघून अनेक ठिकाणी मोठे खड्डे पडले आहेत. त्या खड्ड्यात पाणी जमा होत असल्याने वाहनधारकांची दिशाभूल हाेत आहे. येथे या मार्गावर अपघात घडण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे या रस्त्याची नव्याने बांधणी करावी, अशी मागणी सेवानिवृत्त नायब तहसीलदार आर. डी. राऊत, विश्वनाथ पेशट्टीवार, प्राचार्य उत्तम ढाके, प्रा. गंमतीदास गोगले, शिक्षक सोनल मेश्राम, तारकल बांबोळे, अनिल तुम्पलीवार, अभय बर्लावार, नागेश पेशट्टीवार यांनी आहे.
बाॅक्स
वाहतुकीची काेंडी
चामाेर्शी बायपास मार्गावर राइस मिल, पोस्ट ऑफिस, आश्रमशाळा, नर्सिंग कॉलेज, भूमिअभिलेख कार्यालय, उपविभागीय अधिकारी कार्यालय, तलाठी व मंडळ अधिकारी कार्यालय, सेतू केंद्र, दुकान व्यावसायिक व नाेकरदारांची घरे याच परिसरात आहेत. कामानिमित्त येणाऱ्या नागरिकांची तसेच चारचाकी, दुचाकी वाहनधारकांची वर्दळ याच मार्गावरून असते. याशिवाय एका बाजूला सिमेंट काॅंक्रीट रस्ता, तर दुसऱ्या बाजूला खाेदकाम केले आहे. बांधलेला रस्ता उंच असल्याने सध्या खोदलेल्या मार्गाने वाहतूक सुरू आहे. त्यामुळे जि. प. केंद्र शाळा व आष्टी काॅर्नरजवळ दररोज वाहतूक कोंडी होत आहे.
250921\img_20210923_113533.jpg
बायपास रस्त्यावर पडलेले मोठमोठी खड्डे फोटो