पशुसेवक हे गेल्या ५ ते ६ वर्षांपासून रात्री-बेरात्री पशुसेवा देत होते, परंतु फार्ममधील व्यक्ती धनसाय मडावी यांनी आपले मालक हनिफबाबूला फोन केले असता त्यांनी पशुसेवक यांना फोन करून बोलावले. तेव्हा पशुसेवकाने कार्यवाहीबाबत पत्र निघाल्याने रात्री तथा इतर वेळेत सेवा देण्यास नकार दिला. पशुवैद्यकीय दवाखान्यातील अधिकारी वर्ग पहाटे चार वाजता येऊ शकत नसल्याने आणि त्यांचा कोणताही जनावर मालकासोबत संपर्क नसल्याने संपर्क होऊ शकला नाही. त्यामुळे सकाळपर्यंत हनिफबाबू यांच्या गाईच्या पोटातच वासराचा मृत्यू झाल्याने नुकसान झाले आहे.
असाच प्रकार २५ जुलै रोजी जांभूळखेडा येते घडला. यशवंत कवरके यांची म्हैस प्रसूत झाली. मात्र जाड पडला नसल्याने यांनीसुद्धा पशुसेवकाला फोन केले असता, कार्यवाहीबाबत पत्र निघाले असल्याने सेवा देता येणार नाही, असे त्यांनी सांगितले. त्यानंतर जनावर मालकाने कुरखेडा येथील पशुवैद्यकीय दवाखान्यातील साहाय्यक आयुक्त, पशुसंवर्धन, डॉ. संगीता निरगुडकर यांना फोन केला असता त्यांचा फोन दिवसभर बंद दाखविला. त्यामुळे शेवटी जनावर मालकाला जार काढण्याचा अनुभव नसताना स्वतःच आपल्या हाताने जार खेचावे लागले. अशी बिकट परिस्थिती तालुक्यात पशुसेवकांच्या संपामुळे व सरकारच्या धोरणामुळे शेतकऱ्यांवर व पशुपालकांवर आली आहे
त्यामुळे शासकीय यंत्रणेने पशुसेवकांना लघुपशुवैद्यकीय सेवेची परवानगी देऊन रात्री-बेरात्री सेवा देणाऱ्या पशुसेवकास न्याय द्यावा व पशुपालकांचे लाखोंचे गाई-म्हशी वाचविण्याचे प्रयत्न करावेत, अशी तालुक्यातील शेतकरी बांधवांची मागणी आहे.
290721\1834-img-20210729-wa0095.jpg
चिखली येथील वैद्यकीय सेवे अभावी मृत्यु झालेली वासरू