लाेकमत न्यूज नेटवर्क
गडचिराेली : शहरात स्वत:चे उत्पन्न वाढविण्यासाठी बहुतांश लाेकांनी काॅम्प्लेक्स बिल्डिंग तसेच निवासाचे घर भाड्याने दिली आहेत. अनेकदा उपद्रवी भाडेकरू किरायदार म्हणून आले आणि स्वत:ला घरमालक समजू लागल्यामुळे भांडणाचे प्रकार वाढले आहे. गडचिराेली पाेलीस ठाण्याच्या हद्दीत घर बळकावल्याबाबतचे गुन्हे दाखल नाही. मात्र किरकाेळ तक्रारी आल्याचे सांगण्यात आले.
मालकांकडून घरातील सामान बाहेर फेकण्याचे प्रकार अनेक ठिकाणी हाेत आहेत. करारनामा असलेल्या लाेकांनाही या उपद्रवाला सामाेरे जावे लागते. चार भिंतीच्या आतील आपले भांडण पाेलीस स्टेशन आणि न्यायालयात देखील जात असल्यामुळे घरमालकांना मनस्ताप सहन करावा लागत आहे.
घर भाड्याने देताना समाेरच्या व्यक्तीचे आधारकार्ड, त्यांच्याकडे असलेले मतदान ओळखपत्र संबंधित घर मालकांनी साेबत घेतल्या पाहिजे. परिसरात प्रतिष्ठीत माणूस त्याला ओळखताे काय, याची सुद्धा खात्री करून घ्यावी. अचानक उद्भवलेल्या प्रसंगाला सामाेरे जाताना समाेरच्या व्यक्तीला अद्दल घडविणे साेपे जाते. हा प्रकार सिव्हिल एरियामध्ये वळू शकताे.
अनेकदा भाडेकरू हे एखाद्या विशिष्ट व्यक्तीच्या सांगण्यावरून घर भाड्याने घेताे आणि घरमालकाला मनस्तापातून कमी-अधिक भावात ती मालमत्ता विक्री करावी लागते. तेव्हा त्यातून त्याची सुटका हाेते. एकूणच गडचिराेली शहर व जिल्ह्यात गुन्हेगारीचे प्रमाण कमी असले तरी भाडेकरूने घर बळकावल्याचे प्रकार भविष्यात उघडकीस येऊ शकतात. खबरदारी बाळगणे गरजेचे आहे.
बाॅक्स..
घर भाड्याने देताना ही घ्या काळजी...
- खाेली भाड्याने देताना घरमालकाने त्याच्याकडून करारनामा करून घ्यावा.
- भाडेकरू म्हणून येणाऱ्या व्यक्तीच्या ओळखीचा फाेटाे आयटी घरमालकाने स्वत:कडे ठेवावा.
- ज्या परिसरामध्ये भाडेकरू राहायला आला, त्याने जुने घर का साेडले, घरातील तुटफूट दुरुस्ती तसेच काही बदल, नुकसानदेखील करारनाम्यात लिहावे.
बाॅक्स...
काही प्रकरणे न्यायालयात
-घरातील पाणी बिल, लाईट बिल यावरून घरमालक व किरायदार यांच्यामध्ये बऱ्याचदा भांडणे हाेतात.
-भाडे वेळेवर न देणे, घर खाली न करणे, भाडे घेण्यासाठी आल्यावर घरमालकाला शिव्या देणे. लाेकांच्या सांगण्यावरून घरमालकांसाेबत किरकाेळ गाेष्टीवरून भांडण करणे, असे प्रकार वाढले असून यातील काही प्रकरण न्यायालयातही दाखल हाेतात.
-एखादा भूमाफिया जागा बळकाविण्यासाठी किरायदारामध्ये भांडणे लावत असताे. पडद्याआड राहून ताे भाडेकरूला साथ देताे.
-घरमालक व किरायदारामध्ये असलेले भांडण पाेलीस ठाणे किंवा तंटामुक्त समितीच्या मध्यस्तीने साेडविले जातात.
बाॅक्स...
भाडे रकमेच्या तक्रारी
भाडेकरूने खाेली किंवा घर बळकाविल्याच्या गडचिराेली पाेलीस ठाण्यात तक्रारी दाखल नाही. मात्र भाडे रक्कम देत नसल्याच्या अनेक तक्रारी प्राप्त आहेत.
काेट...
अनेक ठिकाणी किरकाेळ बाबीवरून भांडणे हाेतात. ही भांडणे काही वेळा टाेकाला जातात. अशावेळी गुन्हा घडण्याची शक्यता असते. काही लाेकांच्या सांगण्यावरून भाडेकरू व घरमालक यांच्यात संबंध बिघडण्याचे प्रकार हाेतात. दरम्यान पाेलिसांच्या मदतीने समजूत घालून भांडणे साेडविले जातात. यावर ताेडगा न निघाल्यास प्रसंगी गुन्हे दाखल करण्याची प्रक्रिया करावी लागते. भाडेकरूंकडून अशा प्रकारची भांडणे वा अनुचित प्रकार हाेऊ नये, यासाठी घरमालकांनी सर्व शहानिशा करून व ओळखपत्र घेऊन भाडेकरू ठेवावे.
- प्रमाेद बानबले, पाेलीस निरीक्षक,
पाेलीस स्टेशन गडचिराेली