लोकमत न्यूज नेटवर्कगडचिरोली : जिल्हा सामान्य रूग्णालयाच्या राष्ट्रीय पॅलेएटिव्ह केअर कार्यक्रमांतर्गत जागतिक पॅलेटिव्ह केअर दिनानिमित्त शनिवारी स्थानिक जिल्हा सामान्य रूग्णालयात आरोग्य तपासणी व मार्गदर्शन शिबिर घेण्यात आले. या शिबिरात कर्करोग, लकवा व क्षयरोग अशा मिळून एकूण ५४ रूग्णांची तपासणी करण्यात आली. यावेळी मार्गदर्शन करताना रूग्णांसाठी व्यायाम, दैनंदिन आहार व कुटुंबियांकडून मिळणारा मानसिक आधार महत्त्वाचा आहे, असे प्रतिपादन जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. अनिल रूडे यांनी केले. याप्रसंगी ते अध्यक्षस्थानावरून ते बोलत होते.याप्रसंगी मंचावर प्रमख मार्गदर्शक म्हणून अतिरिक्त जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. माधुरी किलनाके, बाह्य संपर्क वैद्यकीय अधिकारी डॉ. भागराज धुर्वे, डॉ. राजन यादव, डॉ. मनिष मेश्राम, डॉ. कोरेटी, डॉ. डहाके, डॉ. सोनाली कुंभारे, परिचारिका कुमरे आदी उपस्थित होते. पुढे बोलताना अनिल रूडे म्हणाले, पॅलेएटिव्ह केअर कार्यक्रमांतर्गत आरोग्य कर्मचारी गृहभेटी देऊन रूग्णसेवेचे काम करीत आहेत. रूग्णाचे सामान्य लक्षणे व त्यावरील उपाय काय आहे. तसेच रूग्णाला असलेले दुखणे हे केवळ शारीरिक नसून मानसिक, सामाजिक व आत्मिक असू शकते. त्यामुळे कुटुंबियांनी रूग्णाशी चांगला संवाद ठेवणे आवश्यक आहे, असे डॉ. रूडे यांनी सांगितले.लकवा मारलेल्या रूग्णांना नियमित व्यायाम व औषधोपचाराची आवश्यकता आहे. आजारग्रस्त रूग्णांची काळजी घेणे गरजेचे आहे, असे डॉ. भागराज धुर्वे यांनी सांगितले. डॉ. माधुरी किलनाके म्हणाले, कर्करोगाचे प्रमाण गडचिरोली जिल्ह्यात वाढत आहे. हा दीर्घकाळ आजार असल्याने रूग्णांनी केमोथेरपी सुविधेचा स्थानिक स्तरावर लाभ घ्यावा, असे त्यांनी सांगितले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक राहूल कंकनालवार, संचालन दिनेश खोरगडे यांनी केले तर आभार गोपाल पेंदाम यांनी मानले.२५ कर्करूग्णांना आर्थिक मदतगडचिरोली जिल्ह्यात २०१४ पासून पॅलेएटिव्ह केअर कार्यक्रम सुरू असून या अंतर्गत गडचिरोली, आरमोरी, चामोर्शी या तीन तालुक्यात रूग्णांना सेवा पुरविली जात आहे. बाह्यरूग्ण, आंतररूग्ण विभाग व गृहभेटीद्वारे संबंधित रूग्णांना सेवा पुरविली जात आहे. सन २०१७-१८ मध्ये १२५ दुर्धरग्रस्त रूग्णांना सेवा देण्यात आली. तसेच यावर्षी जिल्हा आरोग्य अधिकारी, जिल्हा परिषद कार्यालयामार्फत जिल्ह्यातील २५ कर्करूग्णांना पुढील उपचारासाठी प्रत्येकी १५ हजार रूपयांचे आर्थिक मदत देण्यात आली. याबाबतचे धनादेश संबंधितांना प्रदान करण्यात आले.
शिबिरात ५४ रूग्णांची आरोग्य तपासणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 14, 2018 11:47 PM
जिल्हा सामान्य रूग्णालयाच्या राष्ट्रीय पॅलेएटिव्ह केअर कार्यक्रमांतर्गत जागतिक पॅलेटिव्ह केअर दिनानिमित्त शनिवारी स्थानिक जिल्हा सामान्य रूग्णालयात आरोग्य तपासणी व मार्गदर्शन शिबिर घेण्यात आले.
ठळक मुद्देअनिल रूडे यांचे प्रतिपादन : रूग्णांसाठी व्यायाम, आहार व मानसिक आधार महत्त्वाचा