शहरं
Join us  
Trending Stories
1
लक्ष्मण हाकेंकडून मद्यप्राशन करून शिविगाळ, मराठा आंदोलकांचा आरोप, पुण्यात तणाव  
2
'दहशतवादाला कुठेही जागा नाही', युद्धाच्या पार्श्वभूमीवर PM मोदींची नेतन्याहूंशी फोनवर चर्चा...
3
"उद्धव ठाकरेंनी आमच्यावर टीका करताना आरसा बघावा", देवेंद्र फडणवीस यांचा टोला
4
बंडखोरी, मुख्यमंत्रिपदावरील दावेदारीसह या ४ मुद्यांनी हरियाणात वाढवलंय भाजपा, काँग्रेसचं टेन्शन
5
मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेचे पैसे लाटणाऱ्यांवर काय कारवाई होणार? मंत्री अदिती तटकरे म्हणाल्या...
6
"राहुल निरागस, स्वतःला फॅन्टम समजतात; त्यांनी...", हिमंता बिस्वा सरमांची बोचरी टीका
7
आता कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धरामय्या ईडीच्या निशाण्यावर! MUDA घोटाळ्याप्रकरणी PMLA अंतर्गत FIR दाखल
8
राहुल गांधी ४,५ ऑक्टोबरला महाराष्ट्रात; छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळयाचे करणार अनावरण
9
Akola: मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री हरवले आहेत, अकोल्यात कॉग्रेसचे अनोखे आंदोलन
10
"दम असेल तर उद्धव ठाकरेंनी फडणवीसांविरोधात निवडणूक लढावी", फडणवीसांचे निकटवर्तीय जोशींचे आव्हान
11
इलेक्टोरल बाँड खंडणी प्रकरणात अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांना दिलासा, उच्च न्यायालयाकडून तपासाला स्थगिती
12
विधानसभा निवडणुकीसाठी काँग्रेसचे उमेदवार कसे निवडले जाणार? पक्षश्रेष्ठींनी ठरवला 'मास्टरप्लॅन'
13
विमान अपहरणानंतर वाटाघाटींसाठी गेलेल्या जसवंत सिंहांच्या लाल सुटकेसमध्ये काय होतं? २५ वर्षांनंतर मुलाने केला मोठा गौप्यस्फोट  
14
अवघ्या २३ धावा, ३ षटकार; तरीही रोहितने केली 'मास्टरब्लास्टर'ची बरोबरी, काय केला पराक्रम?
15
"हा 'पंढरी' कायम चालत राहील आणि...", पॅडी कांबळेची पोस्ट चर्चेत
16
पंतप्रधान नरेंद्र मोदी शनिवारी ठाणे जिल्हा दौऱ्यावर; अधिकाऱ्यांनी घेतली पूर्वतयारी आढावा बैठक! 
17
अपक्ष निवडणूक लढवतेय देशातील सर्वात श्रीमंत महिला; मुलगा प्रचारापासून लांब तर सून मैदानात
18
नोकरी सोडून गेलेल्या कर्मचाऱ्याला Google ने परत बोलावले; पगार तब्बल 22,000 कोटी रुपये!
19
युवासेनेच्या आनंदावर विरजण? ‘पिक्चर अभी बाकी है’ म्हणत सिनेट निकालाला हायकोर्टात आव्हान
20
"ब्राह्मणांना मारून योगीं आदित्यनाथ...!"; हे काय बोलून गेले काँग्रेस नेते रणदीप सिंह सुरजेवाला?

सहायक प्राध्यापक भरती प्रक्रिया रद्द करा

By admin | Published: August 06, 2014 11:50 PM

गोंडवाना विद्यापीठात २० सहाय्यक प्राध्यापक पदाच्या भरतीसाठी ११ जून २०१४ च्या शासन परिपत्रकाचा चुकीचा अर्थ लावण्यात आला आहे. यामुळे विद्यापीठ कायदा १९९४ नुसार नागपूर

गोंडवाना विद्यापीठ : ओबीसी संघर्ष समितीची मागणीगडचिरोली : गोंडवाना विद्यापीठात २० सहाय्यक प्राध्यापक पदाच्या भरतीसाठी ११ जून २०१४ च्या शासन परिपत्रकाचा चुकीचा अर्थ लावण्यात आला आहे. यामुळे विद्यापीठ कायदा १९९४ नुसार नागपूर विद्यापीठाच्या ३० एप्रिल १९९६ मधील क्रमांक २ च्या दिशानिर्देशाचे स्पष्ट उल्लंघन झाले आहे. त्यामुळे गोंडवाना विद्यापीठाने सहाय्यक प्राध्यापकांची भरती प्रक्रिया रद्द करावी, अशी मागणी ओबीसी संघर्ष कृती समितीने प्रभारी कुलगुरू तथा जिल्हाधिकारी रणजितकुमार यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे. गोंडवाना विद्यापीठाची निर्मिती झाल्यानंतर राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाचे अधीसूचना व अधिनियम तसेच १९९४ चा महाराष्ट्र विद्यापीठ कायदा गोंडवाना विद्यापीठाला जशाचा तसा लागू करण्यात आला आहे. या संदर्भात ओबीसी संघर्ष कृती समितीचे जिल्हाध्यक्ष अरूण पाटील मुुनघाटे, उपाध्यक्ष रमेश भुरसे, सचिव प्रशांत वाघरे, ओबीसी कर्मचारी असोसिएशनचे अध्यक्ष शेषराव येलेकर यांनी विद्यापीठाचे प्रभारी कुलगुरू तथा जिल्हाधिकारी रणजितकुमार यांची भेट घेऊन सदर बाब निदर्शनास आणून दिली. यावेळी जिल्हाधिकारी रणजितकुमार यांनी सर्व बाबींची कायदेशीरत: तपासून निर्णय घेण्याचे आश्वासन शिष्टमंडळाला दिले. यावेळी सुरेश मांडवगडे, प्रभाकर वासेकर, गोवर्धन चव्हाण, प्रा. राजेश कात्रटवार, बंडू शनिवारे, नंदू कायरकर, गोवर्धन चव्हाण उपस्थित होते. (प्रतिनिधी)