ऑनलाईन लोकमतगडचिरोली : कमी पटसंख्येच्या प्राथमिक शाळा बंद करण्याचा निर्णय रद्द करण्यात यावा, सध्या सुरू असलेली जिल्ह्यातील कमी पटसंख्येची कोणतीच शाळा बंद करू नये, अशी मागणी महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक समिती जिल्हा शाखा गडचिरोलीच्या वतीने शासनाकडे करण्यात आली आहे. यासंदर्भात समितीच्या शिष्टमंडळाने जिल्हाधिकाºयांमार्फत मुख्यमंत्र्यांकडे निवेदन पाठविले आहे.निवेदनात समितीने म्हटले आहे की, स्थानिक स्वराज्य संस्थांच्या प्राथमिक शाळा, विद्यार्थी व शिक्षकांचे अनेक प्रश्न प्रलंबित असताना कमी पटसंख्येच्या नावाखाली प्राथमिक शाळा बंद करणे चुकीचे आहे. सदर निर्णयामुळे ग्रामीण भागातील बालकांच्या शिक्षणाची हेळसांड होणार आहे. तसेच ग्रामीण भागात निरक्षरतेची समस्या निर्माण होणार आहे. त्यामुळे शासनाने शाळा बंद करू नये, असे म्हटले आहे. जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देताना समितीचे जिल्हाध्यक्ष धनपाल मिसार, रमेश रामटेके, नरेंद्र कोत्तावार, राजे बाळराजे, जयंत राऊत, डंबेश पेंदाम, मनोज रोकडे, राकेश सोनटक्के, राजेंद्र भुरसे, अविनाश वराडे, विठ्ठल होंडे आदी उपस्थित होते.
शाळा बंदचा निर्णय रद्द करा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 08, 2018 1:10 AM
कमी पटसंख्येच्या प्राथमिक शाळा बंद करण्याचा निर्णय रद्द करण्यात यावा, सध्या सुरू असलेली जिल्ह्यातील कमी पटसंख्येची कोणतीच शाळा बंद करू नये, ....
ठळक मुद्देनिवेदन सादर : प्राथमिक शिक्षक समितीची शासनाकडे मागणी